Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
जेव्हा तुमचं मूल प्रश्न विचारतं
३–५ वर्षे
शरीर आणि शरीराचे अवयव

माझ्या भाऊ/बहिणीच्या शरीराचा एक अवयव माझ्यापेक्षा वेगळा का आहे?

शेअर करा

काय सांगावं

सांगा: “मुलगे आणि मुली यांच्या शरीरातील काही अवयव वेगळे असतात. मुलग्यांना शिश्न (penis) असते. मुलींना योनी (vulva) असते. हे खासगी अवयव आहेत. आपले हात आणि डोळे जसे असतात, तसाच हाही आपल्या शरीराचा एक सामान्य भाग आहे.”

जर तुमच्या मुलाने “का?” असे विचारले तर: “प्रत्येक शरीर वेगळ्या पद्धतीने बनलेले असते. सगळी शरीरे चांगली आणि महत्त्वाची असतात,” असे म्हणा.

“नाक” किंवा “गुडघा” म्हणताना जो शांत आवाज वापरता, त्याच आवाजात सर्व अवयवांसाठीची योग्य नावे म्हणा (डोके, हात, छाती, शिश्न (penis), योनी (vulva), योनीमार्ग (vagina), नितंब).

किती सांगावं

दोन ते चार वाक्ये पुरेशी आहेत. फक्त जे विचारले आहे त्याचेच उत्तर द्या. मुलाने विचारल्याशिवाय यौवनावस्था किंवा बाळ कसे होते हे समजावू नका. मुलाचा बोलण्यातील रस संपला आणि ते पुन्हा खेळायला गेले, तर थांबा. दुसऱ्या दिवशी तुम्ही या विषयावर परत येऊ शकता.

कोणती मूल्यं रुजवावीत

  • प्रत्येक शरीर नॉर्मल आहे आणि त्याची लाज वाटण्याचे काही कारण नाही
  • शरीराचे अवयव घाणेरडे किंवा हसण्यासारखे नसतात
  • योग्य नावे वापरणे नॉर्मल आणि आदराचे आहे
  • खासगी अवयव खासगीच असतात

काय बोलू किंवा करू नये

  • “घाण”, “छी”, “लाज वाटत नाही का” किंवा “असले प्रश्न विचारू नकोस” असे म्हणू नका
  • हसू नका, धक्का बसल्यासारखे दाखवू नका किंवा पटकन विषय बदलू नका
  • भावंडांच्या किंवा चुलत/मावस भावंडांच्या शरीरांशी तुलना करू नका
  • गमतीदार नावे बनवून इतरांसमोर तीच म्हणण्याचा आग्रह धरू नका

पालकांसाठी टिपा

  • ज्या मुलांना योग्य नावे माहीत असतात, त्यांना काही चुकीचे घडले तर ते विश्वासू मोठ्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगता येते. म्हणूनच आत्ता केलेली अगदी छोटी चर्चाही मदतीची ठरू शकते.
  • अंघोळीची वेळ, कपडे घालणे आणि शौचालयाची सवय लावणे ह्या प्रसंगांमध्ये अवयवांची नावे सांगण्याची संधी सहजपणे मिळू शकेल.
  • तुम्हाला अवघडल्यासारखे वाटत असेल, तर एकटे असताना “शिश्न” आणि “योनी” हे शब्द एकदा मोठ्याने म्हणून पाहा. त्यामुळे तुम्हाला ते मुलांना सांगणे अवघड वाटणार नाही.
  • अनेकदा मुले प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतात. पुनरावृत्ती हा त्यांच्या शिकण्याचा मार्ग आहे, तुमचे काही चुकले आहे असा याचा अर्थ नाही. त्यांना नक्की काय समजले नाही ते समजून घ्या आणि संयमाने पुन्हा उत्तर द्या.
  • एखादे नाव किंवा तथ्य तुम्हाला माहीत नसेल, तर म्हणा “मी समजून घेऊन तुला सांगते/सांगतो.”

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा