Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
जेव्हा तुमचं मूल प्रश्न विचारतं
३–५ वर्षे
गोपनीयता, मर्यादा आणि संमती

मला एखाद्या नातेवाईकाला पापी किंवा मिठी द्यायला आवडत नाही. मला ते करावेच लागेल का?

शेअर करा

काय सांगावं

सांगा: “तू नमस्ते करून, हस्तांदोलन करून, हाय-फाइव्ह देऊन किंवा हसून अश्या इतर प्रकारेही हॅलो म्हणू शकतेस/शकतोस. तुला नको असेल तर कोणाला मिठी किंवा पापी देण्याची गरज नाही. तुझे शरीर तुझे आहे.”

एखादा नातेवाईक यामुळे नाराज झाला, तर तुम्ही त्यांना हलक्याफुलक्या प्रकारे सांगू शकता: “आज ती लाजते आहे, नमस्ते करणे ठीक आहे.”

किती सांगावं

हा विषय समोर येईल त्या क्षणी किंवा अश्या एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या अगदी आधी दोन-तीन ओळींत हे सांगून ठेवा. सूर हलकाफुलका ठेवा. खेळाद्वारे सराव करून पहा. “मिठी मारायची नसल्यास ती न मारता आपण हॅलो कसे म्हणू शकतो?”

कोणती मूल्यं रुजवावीत

  • मुलाचे शरीर मुलाचे स्वतःचे असते
  • मोठ्यांना अनेक प्रकारे आदर दाखवता येतो
  • मुलाचे नाही म्हणणे ऐकले जाते
  • मोठ्यांदा दाखवण्याचा आदर आणि निवडीचे स्वातंत्र्य ह्या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकतात

काय बोलू किंवा करू नये

  • मुलावर जबरदस्ती करू नका किंवा अपराधीपणाची भावना लादू नका (“त्यांना वाईट वाटेल”, “त्यांचा अपमान करू नकोस”, “लोक काय म्हणतील?” असे म्हणू नका)
  • नकार दिल्याबद्दल शिक्षा करू नका
  • स्पर्शाच्या बाबतीत मुलाला “चांगले वाग” असे सांगू नका

पालकांसाठी टिपा

  • ही सुरक्षिततेबद्दलची सुरुवातीच्या वयातील सर्वांत मजबूत शिकवण आहे. नाही म्हणणे ऐकले जाते हे शिकलेले मूल, काही असुरक्षित घडले तर बोलून दाखवण्याची शक्यता जास्त असते.
  • एकत्र कुटुंबांमध्ये मोठ्यांना वाईट वाटू शकते. असे झाल्यास आदर दाखवण्यासाठी मिठीची गरज नसते हे त्यांना नंतर खासगीत समजावून सांगा.
  • मूल अचानक आणि ठामपणे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला नकार देत असेल, तर जबरदस्ती करू नका. हळूच विचारा, “या व्यक्तीबद्दल तुला काही नकोसे वाटते का?” आणि ऐका. कदाचित ती फक्त नावड असेल, पण ते गांभीर्याने घ्या.

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा