Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

सहजची सत्रे घेण्यासाठी आवश्यक ते सगळे साहित्य

सहज अभ्यासक्रम

सहजच्या प्रत्येक सत्रामध्ये एक सत्र आराखडा, एक पीपीटी आणि वर्गात मुलांना किंवा प्रशिक्षकांना वापरता यावे असे छापण्यायोग्य साहित्य आहे.
इयत्ता
संकल्पना
विषय

पूर्व प्राथमिक

इयत्ता १ली व २री
16 सत्रे
शरीर, सुरक्षितता आणि कुटुंबे संवादात्मक पद्धतीने शिकवूयात.
इयत्ता 1
मूल्ये, हक्क आणि विविधता

सर्वांचे स्वागत आहे

मुले स्वतःबद्दल, आपल्या आरोग्याबद्दल, नातेसंबंधांबद्दल आणि सुरक्षित राहण्याबद्दल शिकण्याच्या प्रवासाला सुरुवात करतात. सगळे मिळून वर्गाचे नियम ठरवतात आणि भाषा, अन्न किंवा अनुभव कोणतेही असोत, प्रत्येकाला इथे स्थान आहे हे जाणून घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 1
नातेसंबंध आणि संवाद

मैत्री

चांगला मित्र किंवा मैत्रीण म्हणजे कसा/कशी? मुले मैत्रीची वैशिष्ट्ये सांगतात, कोणत्याही लिंगभावाच्या, क्षमतेच्या किंवा आरोग्य स्थितीच्या मित्रमैत्रिणींचे स्वागत करायला शिकतात आणि एकमेकांसोबत भावना व्यक्त करण्याच्या चांगल्या पद्धती शिकतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 1
मानवी शरीर आणि विकास

आपले शरीर समजून घेऊया

मुले खाजगी अवयवांसह शरीराच्या अवयवांची योग्य नावे जाणून घेतात आणि आरोग्य, आत्मविश्वास व सुरक्षितता यांसाठी ती योग्य नावांनीच घेणे का महत्त्वाचे आहे हे समजून घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 1
मानवी शरीर आणि विकास

जीवनाचे चक्र

बिया, प्राणी आणि माणसे – मुले प्रजनन म्हणजे काय ते शोधतात, कोणत्या गोष्टी प्रजनन करतात आणि कोणत्या नाही याची वर्गवारी करतात आणि जीवन पुढे कसे चालू राहते याची सोपी पहिली ओळख करून घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 1
हिंसा आणि सुरक्षितता

मी आणि माझा खाजगीपणा

हे शरीर माझे आहे, हे मुले जाणून घेतात. कोणते स्पर्श ठीक वाटतात आणि कोणते नाही ते सांगतात, काही अस्वस्थ करणारे घडले तर काय बोलायचे आणि कसे वागायचे याचा सराव करतात आणि आपल्याला कसा स्पर्श केला जावा हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे हे शिकतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 1
हिंसा आणि सुरक्षितता

हे शरीर माझे आहे

सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श यांतला फरक कसा ओळखायचा हे मुले शिकतात, कोणत्या वागणुकीबद्दल कुणाला तरी सांगायला हवे ते ओळखतात आणि प्रश्न किंवा काळजी असेल तेव्हा कधीही जाता येईल अशी विश्वासाची मोठी व्यक्ती निवडतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 1
लिंगभाव

माझा राणी बाळ

मुलगे हवे ते कपडे घालू शकतात का आणि मुली कोणताही खेळ खेळू शकतात का? कपडे, खेळ आणि कामे सगळ्यांसाठी असतात हे मुले शोधतात आणि इतरांच्या अपेक्षांपेक्षा वेगळे असणाऱ्यांशी दयाळूपणे आणि सर्वांना सामावून घेत वागण्याचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 1
मूल्ये, हक्क आणि विविधता

माझे घर, माझे कुटुंब

जगात अनेक प्रकारची कुटुंबे असतात हे मुले जाणून घेतात, प्रत्येकाचा आदर करायला शिकतात आणि प्रेम व काळजी यांमुळेच कुटुंब बनते हे समजून घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 2
मूल्ये, हक्क आणि विविधता

चला एकत्र शिकूया

मुले आपल्याला सोयीचे वाटेल तितकेच आपल्या आवडीनिवडींबद्दल सांगतात आणि इतरांचे लक्षपूर्वक ऐकण्याचा, त्यांचे कौतुक करण्याचा आणि त्यांना न चिडवण्याचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 2
मानवी शरीर आणि विकास

आपल्या शरीराचे भाग

आधीच्या शिक्षणावर पुढे जात मुले स्त्री आणि पुरुषाच्या प्रजनन संस्थेतील महत्त्वाच्या अवयवांची नावे सांगतात आणि शरीराच्या अवयवांची योग्य नावे माहीत असणे का महत्त्वाचे आहे ते समजून घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 2
हिंसा आणि सुरक्षितता

दादागिरी म्हणजे काय?

मुले दादागिरी आणि चिडवणे म्हणजे काय ते सांगतात, दोन्हींमधला फरक ओळखतात आणि दोन्ही दुखावणारे व चुकीचे का आहे यावर चर्चा करतात. यातून इतरांबद्दलची संवेदनशीलता आणि सह-अनुभूती वाढते.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 2
हिंसा आणि सुरक्षितता

चिडवणे आणि दादागिरी आता बास!

कुणी आपल्यावर दादागिरी केली तर काय करता येईल? मुले त्याला प्रभावीपणे प्रतिसाद देण्याच्या पद्धतींचा सराव करतात आणि दादागिरी थांबवण्यासाठी कोणत्या मोठ्या व्यक्तींकडे जाता येईल ते ठरवतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 2
हिंसा आणि सुरक्षितता

सुरक्षित राहूया

मुले सोप्या भाषेत वैयक्तिक मर्यादा, संमती आणि शारीरिक स्वायत्तता या संकल्पना समजून घेतात. ते सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श ओळखतात, असुरक्षित परिस्थितीत काय करायचे याचा विचार करतात आणि मदत करू शकेल अशा एका मोठ्या व्यक्तीचे नाव सांगतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 2
आरोग्य आणि स्वास्थ्यासाठीची कौशल्ये

सगळ्यांसोबत आणि स्वतःला आवडेल तसे असणे!

मित्रमैत्रिणी आणि गट आपल्यावर चांगला किंवा वाईट प्रभाव टाकू शकतात. सामावून घेतले जाणे, दडपण येणे किंवा बाजूला पडणे अशा भावना मुले समजून घेतात आणि गटातली एखादी गोष्ट अस्वस्थ करणारी वाटली तर आदरपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने प्रतिसाद देण्याचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 2
लिंगभाव

सप्तरंगी मुलगे आणि सप्तरंगी मुली

मुलगे आणि मुली यांनी काय करायला 'हवे' या लिंगभावाच्या चौकटींमधल्या कल्पना मुले उलगडून पाहतात आणि या कल्पनांमुळे कोणत्याही लिंगभावाच्या व्यक्तीवर कशी बंधने येतात ते समजून घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 2
मूल्ये, हक्क आणि विविधता

आपण सगळे खास आहोत

प्रत्येकाला खास बनवणाऱ्या गोष्टींचा मुले आनंदाने उत्सव करतात, वर्गातील इतरांबद्दल नवीन गोष्टी जाणून घेतात आणि वेगळेपणाची कदर करतात. तसेच दयाळूपणा आणि मैत्री यांसारखी समान मूल्ये सगळ्यांना एकत्र शिकायला कशी मदत करतात ते पाहतात.
६० मिनिटे
EN, मराठी

प्राथमिक

इयत्ता ३ री ते ५ वी
24 सत्रे
मोठे होणे, भूमिका आणि आदर यांसंबंधीचा पाया पक्का करूया.
इयत्ता 3
मानवी शरीर आणि विकास

माझी कालरेषा

मानवी विकासाचे टप्पे ओळखून आणि आपल्या आयुष्याच्या आधीच्या टप्प्यांतील महत्त्वाचे क्षण आठवून मुले आपल्या वाढीची कालरेषा तयार करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 3
आरोग्य आणि स्वास्थ्यासाठीची कौशल्ये

जेव्हा शरीराला काळजीची गरज असते

आरोग्य म्हणजे शरीर, मन आणि भावना यांची काळजी घेणे. मुले खाजगी अवयवांसह शरीराच्या अवयवांची उजळणी करतात, आरोग्यदायी सवयी शिकतात आणि आजारी असलेल्या मित्राला किंवा मैत्रिणीला मदत कशी करायची आणि स्वतः मदत कशी मागायची ते शिकतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 3
हिंसा आणि सुरक्षितता

चिडवाचिडवी, छळ आणि दादागिरी म्हणजे काय?

चिडवाचिडवी, छळ आणि दादागिरी यांतला फरक मुले ओळखायला शिकतात, ते चुकीचे का आहे ते समजून घेतात, आवाज उठवण्याच्या पद्धतींचा सराव करतात आणि ज्यांना सांगता येईल अशा विश्वासाच्या मोठ्या व्यक्ती निवडतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 3
नातेसंबंध आणि संवाद

स्पष्टपणे सांगा, लक्ष देऊन ऐका

मधमाश्यांपासून पक्ष्यांपर्यंत निसर्गात सगळीकडे संवाद आहे. माणसे कशा प्रकारे संवाद साधतात हे मुले शोधतात आणि स्पष्टपणे बोलण्याचा आणि लक्ष देऊन ऐकण्याचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 3
हिंसा आणि सुरक्षितता

मदत घ्यायला काहीच हरकत नाही

नको असलेला स्पर्श, किंवा कुणाला तरी स्पर्श करायला लावले जाणे यात कधीच मुलांची चूक नसते हे मुले समजून घेतात. ते शरीराचे संकेत ओळखायला, विश्वासाच्या मोठ्या व्यक्तींची नावे सांगायला आणि अवघड अनुभव कुणाला तरी सांगण्याचे मार्ग शोधायला शिकतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 3
मूल्ये, हक्क आणि विविधता

हो तर हो, नाही तर नाही

वैयक्तिक जागा, मर्यादा, शारीरिक स्वायत्तता आणि संमती याबद्दल मुले जाणून घेतात. आपल्या मर्यादा स्पष्टपणे कशा सांगायच्या आणि इतरांच्या मर्यादांचा आदर कसा करायचा याचा ते सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 3
लिंगभाव

कोण काय करू शकते?

काही कामे आणि खेळ फक्त मुलग्यांसाठी किंवा फक्त मुलींसाठी असतात का? लिंगभावाच्या चौकटी म्हणजे काय ते मुले समजून घेतात आणि अशा कल्पनांमुळे सर्व लिंगभावाच्या व्यक्तींवर कशी बंधने येतात ते पाहतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 3
मूल्ये, हक्क आणि विविधता

आपल्या आसपासची माध्यमे

रोजच्या आयुष्यातील माध्यमे आणि उपकरणे मुले शोधतात. माध्यमे माणसांनी बनवलेली असतात आणि ती खरी, काल्पनिक, संपादित किंवा अतिशयोक्त असू शकतात हे ते शिकतात, आणि काही पाहून किंवा ऐकून अस्वस्थ वाटले तर कुणाकडे जायचे ते ओळखतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 4
मानवी शरीर आणि विकास

बदल चांगला आहे की!

वयात येणे हा मोठे होण्याचा नैसर्गिक भाग आहे. या काळात होणारे शारीरिक, सामाजिक आणि भावनिक बदल आणि वैयक्तिक स्वच्छता कशी राखायची हे मुले जाणून घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 4
नातेसंबंध आणि संवाद

मैत्री कशी असावी?

मुले मैत्रीतील निरोगी आणि अनारोग्यकारक वागणूक ओळखतात, भावना व्यक्त करण्यासाठी आणि वाद सोडवण्यासाठी PAL मॉडेल वापरतात आणि दुखावले गेल्यावर किंवा असुरक्षित वाटल्यावर कुणाकडे जायचे ते ठरवतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 4
हिंसा आणि सुरक्षितता

दादागिरीला विरोध करू!

दादागिरीचा काय परिणाम होतो ते मुले समजून घेतात, बघ्याची भूमिका आणि मदतीला उभे राहणाऱ्याची भूमिका यांतला फरक शिकतात आणि दादागिरीला बळी पडणाऱ्याला मदत करण्याच्या चार पायऱ्यांवर आधारित लघुनाटिका सादर करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 4
आरोग्य आणि स्वास्थ्यासाठीची कौशल्ये

माझ्या मनाच्या लहरी

सगळ्या भावना योग्यच असतात आणि त्या आपल्याला काय हवे आहे ते सांगतात. मुले भावनांचा शब्दसंग्रह वाढवतात, भावनांचा संप्रेरकांशी आणि शरीरातील बदलांशी संबंध जोडतात आणि भावना निरोगी पद्धतीने व्यक्त करण्याचा व त्यांना प्रतिसाद देण्याचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 4
हिंसा आणि सुरक्षितता

वैयक्तिक सुरक्षितता

सुरक्षिततेचे स्पष्ट नियम वापरून मुले कोणता स्पर्श सुरक्षित आणि कोणता असुरक्षित ते ठरवतात, आपल्या मर्यादा सांगतात आणि इतरांच्या मर्यादांचा आदर करतात. तसेच SAFE पायऱ्यांचा सराव करतात: Stop (थांबा), Away (तिथून दूर जा), Find an adult (मोठ्या व्यक्तीला शोधा), Explain (सांगा).
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 4
मानवी शरीर आणि विकास

उत्क्रांती समजून घेताना

एका गोष्टीतून मुले माणूस हा निसर्गाचा भाग आहे हे पाहतात आणि विविधता व बदल कालांतराने कसे घडतात ते शिकतात. ते जैविक तथ्ये आणि सामाजिक नियम वेगळे करतात आणि एखादा अन्यायकारक नियम कधी प्रश्नांकित करता येईल हे विचारतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 4
लिंगभाव

लिंगभावाच्या चौकटीपलीकडे मी स्वतंत्र आहे

मुले लिंगभाव ओळख, लिंगभावाच्या भूमिका आणि चौकटी समजून घेतात, समाजाच्या अपेक्षा आपल्या निवडींवर आणि वागण्यावर कसा परिणाम करतात ते पाहतात आणि या चौकटींना आव्हान कसे देता येईल यावर विचार करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 4
मूल्ये, हक्क आणि विविधता

पूर्वग्रह आणि भेदभाव

पूर्वग्रह आणि भेदभाव म्हणजे काय ते मुले जाणून घेतात, इतरांना सन्मानाने आणि आदराने वागवण्याचे मार्ग शोधतात आणि सगळ्यांचा आदर वाढवण्यासाठी ते एकत्र कसे काम करू शकतात ते पाहतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 5
मानवी शरीर आणि विकास

वाढीतील बदलांचा प्रवास

वयात येताना शारीरिक, सामाजिक, बौद्धिक आणि भावनिक बदल होतात. काय अपेक्षित आहे हे मुले जाणून घेतात आणि हे बदल नैसर्गिक असून प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या वेळी होतात हे समजून घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 5
लैंगिक आणि प्रजनन आरोग्य

आपले शरीर: लैंगिक आणि प्रजनन अवयवांची रचना

शास्त्रीय आणि अचूक भाषेचा वापर करून मुले नर आणि मादीच्या लैंगिक व प्रजनन संस्थेतील अवयवांची नावे सांगतात आणि त्यांची कामे समजावून सांगतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 5
लैंगिक आणि प्रजनन आरोग्य

आपल्या जन्माची गोष्ट

वयात येताना नर आणि मादीची शरीरे प्रजननाच्या शक्यतेसाठी कशी तयार होतात हे मुले जाणून घेतात, मासिक पाळी समजून घेतात आणि पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखायची ते शिकतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 5
नातेसंबंध आणि संवाद

मित्रांशी नेहमी प्रांजळ असावे: सुस्पष्ट संवाद

मुले सहनशील, आक्रमक आणि सुस्पष्ट संवाद यांची तुलना करतात आणि मग वेगळे मत सुस्पष्टपणे मांडण्याचा तसेच मित्रमैत्रिणींच्या दडपणाला तोंड देताना नकार देण्याच्या कौशल्यांचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 5
हिंसा आणि सुरक्षितता

माझ्या शरीरावर माझा हक्क

लैंगिक अत्याचार आणि लैंगिक छळ म्हणजे काय ते मुले जाणून घेतात, बोलण्यासाठी विश्वासाची मोठी व्यक्ती निवडतात आणि स्वतःवर किंवा ओळखीच्या कुणावर असे घडल्यास कोणती पावले उचलता येतात ते समजून घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 5
आरोग्य आणि स्वास्थ्यासाठीची कौशल्ये

आपल्या स्वतःशी बोला, अगदी जवळच्या मित्रासारखे

सकारात्मक आणि नकारात्मक स्वसंवाद मुले ओळखतात, त्यांचा आपल्या भावनांवर आणि वागण्यावर कसा परिणाम होतो ते पाहतात आणि मनातल्या टीकाकाराला दयाळू, स्वतःला समजून घेणाऱ्या आवाजात बदलण्याचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 5
लिंगभाव

लिंगभावाच्या चौकटी मोडूया

लिंगभाव अनेकदा जन्मावेळी ठरवला जातो, पण समाज त्याला आकार देतो. मुले प्रचलित चौकटी तपासतात, मुलगे आणि मुलींकडून असलेल्या अपेक्षा अन्याय्य का ठरू शकतात हे विचारतात आणि लिंगभावाच्या भूमिका निवडींवर आणि संधींवर कसा परिणाम करतात यावर विचार करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 5
आरोग्य आणि स्वास्थ्यासाठीची कौशल्ये

थांबा, विचार करा, समस्या सोडवा

स्वजाणीव, चिकित्सक विचार आणि समस्या सोडवणे या कौशल्यांची मुले ओळख करून घेतात आणि भूमिकानाट्यांतून प्रत्यक्ष जीवनातील प्रसंगांमध्ये ती वापरण्याचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी

माध्यमिक

इयत्ता ६ वी ते ८ वी
24 सत्रे
किशोरावस्थेची सुरुवात: तारुण्य, संमती आणि सुरक्षितता.
इयत्ता 6
मानवी शरीर आणि विकास

मी आणि माझे शरीर प्रश्नमंजुषा

प्रश्नमंजुषेच्या स्वरूपातील या सत्रात मुले वयात येताना होणाऱ्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक बदलांबद्दल जाणून घेतात, गैरसमज दूर करतात, स्वतःची काळजी आणि मासिक पाळीतील स्वच्छता शिकतात आणि मोठे होण्याच्या वेगवेगळ्या अनुभवांबद्दल आदर आणि सहसंवेदना बाळगण्याचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 6
मानवी शरीर आणि विकास

सौंदर्य आणि स्वप्रतिमेचा पुनर्विचार

शरीरांची विविधता मुले ओळखतात, सौंदर्याचे निकष समाजाकडून घडवले जातात आणि काळानुसार बदलतात हे जाणून घेतात आणि शरीरावरून हिणवणे व अनादराची भाषा यांमुळे होणारी हानी समजून घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 6
नातेसंबंध आणि संवाद

शब्द आणि त्यांच्या पल्याड: सुस्पष्ट संवाद

मुले सहनशील, सुस्पष्ट आणि आक्रमक संवाद यांची तुलना करतात आणि एखाद्या गोष्टीला सुस्पष्टपणे नाही म्हणण्याचा आणि आपले निर्णय ठामपणे सांगण्याचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 6
मूल्ये, हक्क आणि विविधता

संमती नेहमी घ्यायलाच हवी

संमती म्हणजे काय ते मुले समजून घेतात, आग्रह कुठे संपतो आणि बळजबरी कुठे सुरू होते ते ओळखतात आणि सामाजिक अपेक्षा व दडपणे संमती मागण्याच्या व देण्याच्या पद्धतीवर कसा परिणाम करतात ते तपासतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 6
मूल्ये, हक्क आणि विविधता

एकमेकांच्या मर्यादांचा आदर करूया

वैयक्तिक मर्यादा म्हणजे काय ते मुले समजून घेतात, त्या सांगण्याचा आणि इतरांच्या मर्यादांचा आदर करण्याचा सराव करतात आणि कुणाच्या मर्यादा ओलांडणे कायद्याने गुन्हा असू शकते हे शिकतात. ते लैंगिक अत्याचार म्हणजे काय हेही समजून घेतात आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या एका मदतस्रोताचे नाव सांगतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 6
नातेसंबंध आणि संवाद

आकर्षणावर बोलू काही!

प्रेम आणि आकर्षण म्हणजे काय ते मुले शोधतात, लिंगभाव, धर्म, जात, वर्ग किंवा क्षमता काहीही असो, आकर्षण कुणाबद्दलही वाटू शकते किंवा कुणाबद्दलच वाटत नसू शकते हे शिकतात आणि आवड व्यक्त करण्याच्या तसेच नकार स्वीकारण्याच्या निरोगी पद्धतींवर चर्चा करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 6
लिंगभाव

लिंगभाव: शारीरिक की सामाजिक

मुले लिंग (sex) आणि लिंगभाव (gender) वेगळे करतात, पितृसत्तेची ओळख करून घेतात आणि दीर्घकाळच्या सामाजिक संस्कारांतून घडलेल्या लिंगभावाबद्दलच्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनांना ओळखायला आणि त्यांना आव्हान द्यायला शिकतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 6
मूल्ये, हक्क आणि विविधता

विविध प्रकारची कुटुंबे

कुटुंबाबद्दलच्या पारंपरिक कल्पनांना मुले प्रश्न विचारतात, विविध प्रकारच्या कुटुंबरचना जाणून घेतात आणि स्वीकारतात आणि कुटुंबाबद्दलचे सामाजिक नियम लोकांच्या मूलभूत हक्कांवर कसा परिणाम करू शकतात ते तपासतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 7
लैंगिक आणि प्रजनन आरोग्य

बाळ असे तयार होते तर!

मुले प्रजनन अवयवांची नावे सांगतात आणि गर्भधारणा कशी होते त्याचे टप्पे शिकतात. लैंगिक संबंधाशिवाय गर्भधारणा होण्याचे मार्ग आणि आर्थिक विषमतेमुळे लैंगिक व प्रजनन आरोग्यसेवा मिळवण्यात कशा अडचणी येऊ शकतात ते शोधतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 7
आरोग्य आणि स्वास्थ्यासाठीची कौशल्ये

लुक्स, लाईक्स आणि वास्तव

मुले शरीर-प्रतिमा आणि तिचा आत्मसन्मानाशी असलेला संबंध, आपण आपल्या शरीराकडे कसे पाहतो हे घडवणारे प्रभाव आणि लैंगिक आशय असलेली माध्यमे त्यावर कसा परिणाम करू शकतात ते शोधतात, आणि शरीरांच्या विविधतेबद्दल आदर वाढवतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 7
नातेसंबंध आणि संवाद

प्रेम, मैत्री, आकर्षण

मुले मैत्री आणि प्रेमसंबंध यांची वैशिष्ट्ये पाहतात आणि त्यांच्यात काय समान आहे आणि काय वेगळे आहे याची तुलना करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 7
आरोग्य आणि स्वास्थ्यासाठीची कौशल्ये

‘स्मार्ट’ निर्णयप्रक्रिया

महत्त्वाचे निर्णय घेताना निर्णयप्रक्रियेचे मॉडेल का उपयोगी ठरते हे मुले शोधतात आणि 'स्मार्ट' (SMART) मॉडेल प्रत्यक्ष जीवनातील प्रसंगांमध्ये वापरण्याचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 7
हिंसा आणि सुरक्षितता

लैंगिक छळ: समजून घ्या आणि थांबवा

लैंगिक छळ म्हणजे काय हे मुले समजून घेतात आणि तो आपल्यासोबत घडल्यास सुरक्षितपणे प्रतिसाद कसा द्यायचा, दुसऱ्यासोबत घडताना मदतीला कसे यायचे आणि ओळखीची व्यक्ती इतरांचा छळ करत असेल तर काय करायचे हे शिकतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 7
लैंगिकता आणि लैंगिक वर्तन

हस्तमैथुनामध्ये अपराधी वाटण्यासारखे काही नाही!

आनंद, अपराधीपणा आणि लाज या भावना आणि संस्कृती त्यांना कसा आकार देते हे मुले समजून घेतात, हस्तमैथुन आणि स्वप्नावस्था या नैसर्गिक गोष्टी आहेत हे शिकतात, गैरसमज दूर करतात आणि पोर्नोग्राफी हा वास्तववादी किंवा विश्वासार्ह माहितीचा स्रोत का नाही हे पाहतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 7
नातेसंबंध आणि संवाद

प्रेम म्हणजे नक्की आहे तरी काय?

आवडणे आणि प्रेम करणे यांतला फरक मुले शोधतात, लैंगिक कल म्हणजे काय आणि तो लिंगभाव ओळखीपेक्षा कसा वेगळा आहे ते शिकतात आणि आपल्या भावना समजून घेण्यासाठी वेळ घेणे ठीक आहे हे समजून घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 7
मूल्ये, हक्क आणि विविधता

लोक काय म्हणतील?

कुटुंबांच्या विविध रचना आणि त्यांच्याशी जोडलेल्या पारंपरिक समजुती, तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक नियम वेगवेगळ्या लिंगभाव ओळखीच्या लोकांवर कसा परिणाम करतात हे मुले तपासतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 8
मूल्ये, हक्क आणि विविधता

आपल्या निर्णयांवरचे प्रभाव

नातेसंबंध आणि लैंगिकतेबद्दलचे संदेश किशोरवयीन मुलांना कुठून मिळतात ते मुले ओळखतात, त्या संदेशांमध्ये काय सांगितले जाते ते तपासतात आणि ते स्वतःबद्दलची कल्पना, शरीर-प्रतिमा आणि भविष्यातील लैंगिक निर्णयांना कसा आकार देतात यावर विचार करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 8
लैंगिकता आणि लैंगिक वर्तन

लिंगभाव ओळख आणि लैंगिक कल

लिंग (sex), लिंगभाव (gender), लिंगभाव ओळख आणि लैंगिक कल या संज्ञांची मुले व्याख्या करतात आणि या संज्ञा अनेकदा एकमेकींच्या जागी वापरल्या जात असल्या तरी त्या कशा वेगळ्या आहेत हे शिकतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 8
नातेसंबंध आणि संवाद

नाते सुदृढ आहे का?

निरोगी आणि अनारोग्यकारक नात्यांची वैशिष्ट्ये मुले ओळखतात, सुरुवातीच्या धोक्याच्या सूचना टिपतात आणि मतभेद कसे हाताळायचे आणि आपल्या स्वतःच्या नात्यांतील वागणे कसे सुधारायचे याचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 8
नातेसंबंध आणि संवाद

ब्रेकअप: अवघड पण अशक्य नाही

नात्यांबद्दलच्या आपल्या अपेक्षांवर बाहेरचे कोणते प्रभाव पडतात याचे मुले विश्लेषण करतात आणि विशेषतः अनारोग्यकारक नातं संपवण्याच्या पद्धती आणि मदतीचे स्रोत शोधतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 8
हिंसा आणि सुरक्षितता

धोक्याची सूचना: लैंगिक हिंसा

लैंगिक अत्याचाराचे प्रकार मुले जाणून घेतात, परस्पर संमती आणि हेराफेरी, धमक्या व आक्रमकता यांतला फरक ओळखतात आणि अत्याचारी नात्यांची चिन्हे तसेच अत्याचार आणि सत्ता यांच्यातील संबंध ओळखतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 8
हिंसा आणि सुरक्षितता

ऑनलाईन सुरक्षित कसे राहायचे?

ऑनलाईन संवादाच्या चांगल्या बाजू मुले शोधतात, अयोग्य किंवा धोकादायक ठरू शकणारे फ्लर्टिंग आणि चॅटिंग ओळखतात आणि ऑनलाईन अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगांना कसे हाताळायचे ते शिकतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 8
लिंगभाव

लिंगभावाधारित सत्ता

लिंगभावानुसार हक्क, विशेषाधिकार आणि बंधने कशी वेगळी असतात, कुटुंब, शाळा आणि समाजात सत्ता कशी वाटली जाते आणि अन्याय्य लिंगभाव नियमांना आव्हान देण्याचे मार्ग कोणते हे मुले तपासतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 8
मूल्ये, हक्क आणि विविधता

प्रत्येक शरीर महत्वाचे आहे

शरीरांची विविधता आणि 'आदर्श शरीर' ही कल्पना आत्मसन्मानावर आणि अभिव्यक्तीवर कसा परिणाम करते हे मुले शोधतात व सर्व प्रकारची शरीरे असलेल्या व्यक्तींचा सन्मान करायला शिकतात. अपंगत्व असलेल्या व्यक्तींना रोजच्या जीवनात येणारी आव्हाने व त्यांचे उत्तर शोधण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करायला शिकतात.
६० मिनिटे
EN, मराठी

उच्च माध्यमिक

इयत्ता ९ वी व १० वी
16 सत्रे
किशोरावस्था: हक्क, विविधता, शरीर आणि निवड.
इयत्ता 9
लैंगिकता आणि लैंगिक वर्तन

मी कोण आहे? लैंगिक कल, वर्तन आणि ओळख

मुले वेगवेगळ्या लैंगिक कलांची नावे शिकतात आणि लैंगिक कल, वर्तन आणि ओळख हे तीन घटक वेगळे असूनही एकमेकांशी कसे जोडलेले आहेत ते शिकतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 9
लैंगिक आणि प्रजनन आरोग्य

एचआयव्ही

एचआयव्ही आणि एड्स यांच्यातला फरक, एचआयव्ही कसा पसरतो आणि तो कसा रोखायचा हे मुले जाणून घेतात आणि एआरटी (ART) उपचारांसह मदत, साहाय्य आणि उपचार कुठे मिळू शकतात ते शिकतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 9
लैंगिक आणि प्रजनन आरोग्य

गर्भधारणा व गर्भनिरोधन

गर्भधारणा कशी होते याची मुले उजळणी करतात, लैंगिक संबंधाशिवाय गर्भधारणा होण्याचे मार्ग शोधतात, गर्भधारणेची सामान्य लक्षणे शिकतात आणि गर्भनिरोधकांच्या विविध पर्यायांची ओळख करून घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 9
नातेसंबंध आणि संवाद

ग्रीन फ्लॅग रेड फ्लॅग

नात्यातील रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग कसे ओळखायचे आणि काळजी व नियंत्रण यांतला फरक कसा ओळखायचा हे मुले शिकतात. संमतीसाठी माहिती, इच्छा आणि उत्साह लागतात हे समजून घेऊन या कल्पना ते प्रत्यक्ष जीवनातील आणि गोष्टींवर आधारित प्रसंगांमध्ये वापरतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 9
नातेसंबंध आणि संवाद

प्रेम आहे की नाही?

निरोगी वर्तन आणि नियंत्रण ठेवणारे वर्तन यांतला फरक मुले ओळखतात, प्रेम, काळजी आणि नियंत्रण वेगवेगळे कसे दिसू आणि जाणवू शकते ते शोधतात आणि नात्यांमध्ये आदर आणि समानता कशी वाढवता येईल यावर विचार करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 9
लिंगभाव

पितृसत्तेचे पैलू

पितृसत्ता म्हणजे काय हे मुले शिकतात आणि कुटुंब, शाळा, माध्यमे व समाजातील तिची उदाहरणे ओळखतात. तिचा मुलींवर आणि मुलग्यांवर कसा परिणाम होतो आणि अधिक समानतेचे वातावरण घडवण्यासाठी प्रत्येकजण कसा हातभार लावू शकतो यावर ते विचार करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 9
मूल्ये, हक्क आणि विविधता

सेक्स्टिंग (Sexting) आणि कायदा

सेक्स्टिंग म्हणजे काय आणि त्याचे भावनिक, सामाजिक आणि कायदेशीर परिणाम काय होतात हे मुले जाणून घेतात, ज्यात अल्पवयीन मुलांबद्दल भारतीय कायदा काय सांगतो हेही समाविष्ट आहे. ते अधिक सुरक्षित पर्याय आणि मदत कुठे मिळेल ते शोधतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 9
आरोग्य आणि स्वास्थ्यासाठीची कौशल्ये

लैंगिकतेबद्दल ऑनलाईन शोधताना

लैंगिकताविषयक ऑनलाईन माहिती विश्वासार्ह आहे का हे ठरवण्यासाठी मुले 'साचा' (SACHA) चौकट वापरतात (स्रोत, अजेंडा, तथ्ये तपासा, मला काय वाटते, आणखी एक स्रोत) आणि माहितीचा विचारपूर्वक, प्रश्न विचारत वापर करणारे बनतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 10
मूल्ये, हक्क आणि विविधता

लैंगिकता आणि मूल्ये खुली चर्चा

लैंगिकतेशी संबंधित प्रसंगांबद्दल मुले इतरांच्या दृष्टिकोनांचा आदर राखत आपली मते मांडतात, संमती तसेच निवड, सन्मान, समानता आणि आदर ही मूल्ये लागू करतात आणि गृहितके, नियम आणि पूर्वग्रहांवर प्रश्न उपस्थित करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 10
लैंगिक आणि प्रजनन आरोग्य

लिंग सांसर्गिक व प्रजनन मार्गाचे आजार

प्रजनन मार्गाचे आजार आणि लिंगसांसर्गिक आजार म्हणजे काय, त्यांची लक्षणे आणि परिणाम काय, ते कसे टाळायचे आणि लिंगसांसर्गिक आजार टाळण्याचा एकमेव 100% प्रभावी मार्ग कोणता हे मुले जाणून घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 10
नातेसंबंध आणि संवाद

नात्याचे विविध पैलू

नात्यातील वैशिष्ट्ये निरोगी की अनारोग्यकारक आहेत हे मुले ठरवतात, सत्तेतील फरक आणि त्याचा नात्यावरील परिणाम तपासतात आणि अनारोग्यकारक नातं निरोगी कसं होऊ शकतं यावर चर्चा करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 10
मूल्ये, हक्क आणि विविधता

लैंगिक हक्क हे मानवी हक्क आहेत

मानवी हक्क म्हणजे काय हे मुले शोधतात, लैंगिक हक्क त्याचाच भाग आहेत हे समजून घेतात आणि प्रत्येकाला मिळण्याचा अधिकार असलेले मूलभूत मानवी हक्क कोणते ते सांगतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 10
लैंगिकता आणि लैंगिक वर्तन

लैंगिक निर्णय आणि संमती

निवड आणि जबरदस्ती यांतला फरक मुले ओळखतात, संमतीवर सत्तेचा कसा प्रभाव पडतो ते जाणून घेतात आणि लैंगिक कृतींना 'नाही' म्हणण्याचा अधिकार ठामपणे मान्य करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 10
मूल्ये, हक्क आणि विविधता

लग्न, समाज आणि निवड

लग्नाला आकार देणाऱ्या सामाजिक अपेक्षा, नियम आणि समजुती, तसेच लग्न करायचे का, कधी आणि कुणाशी याचे निर्णय कुणाच्या हातात असतात, याचे मुले परीक्षण करतात आणि नातेसंबंध व जवळीक याबद्दल विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 10
नातेसंबंध आणि संवाद

कल्पना की वास्तव?

दूरदर्शन आणि जाहिरातींमध्ये लैंगिक आशय असलेली माध्यमे रोजच्या जीवनात कशी दिसतात आणि माध्यमांतील लैंगिकतेचे चित्रण प्रेमसंबंध आणि लैंगिक संबंधांना कसा आकार देऊ शकते याचा मुले शोध घेतात.
६० मिनिटे
EN, मराठी
इयत्ता 10
नातेसंबंध आणि संवाद

आपल्याला बोलायला हवे

प्रभावी ऐकणे आणि संवाद यांची वैशिष्ट्ये मुले ओळखतात आणि लैंगिक निर्णयांशी संबंधित प्रसंगांमध्ये त्यांचा सराव करतात.
६० मिनिटे
EN, मराठी

शैक्षणिक संसाधने

सहज राबवण्यासाठीचे साहित्य: शाळेत हा कार्यक्रम कसा राबवावा आणि वर्गामध्ये संवाद कसा घडवून आणावा, याबद्दलची माहिती.
सर्व संसाधने पाहा
सहज: अभ्यासक्रम आणि शैक्षणिक उद्दिष्ट्ये
प्रयास आरोग्य गट

सहज: अभ्यासक्रम आणि शैक्षणिक उद्दिष्ट्ये

इयत्ता 1 ली ते 10 वी साठीचा सर्वंकष, वयानुरूप आणि विषयांची पुनरावृत्ती करत टप्प्याटप्प्याने पुढे जाणारा (स्पायरल) लैंगिकता शिक्षण अभ्यासक्रम.

PDF · EN, मराठी
सर्वंकष लैंगिकता शिक्षण अभ्यासक्रम
प्रयास आरोग्य गट

सर्वंकष लैंगिकता शिक्षण अभ्यासक्रम

मुलं आणि तरुण दररोज त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या आसपासच्या जगाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतात. जसजशी मुलांची वाढ होते, तसतसे त्यांना त्यांचे शरीर, भावना, मैत्री, नातेसंबंध, आकर्षण आणि होणारे बदल, याबद्दल प्रश्न पडणे नैसर्गिकच आहे.

PDF · EN
सहज एज्युकेटर्स फेलोशिप अहवाल 2025-2026
प्रयास आरोग्य गट

सहज एज्युकेटर्स फेलोशिप अहवाल 2025-2026

महाराष्ट्रभर लहान मुले व युवांसोबत काम करणाऱ्या व्यक्ती लैंगिकता प्रशिक्षक म्हणून तयार व्हाव्यात यासाठी प्रयास आरोग्य गटाने सहज एज्युकेटर्स फेलोशिप हा 8 महिन्यांचा संमिश्र (ऑनलाईन व ऑफलाईन) स्वरूपाचा प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केला आहे.

PDF · EN
सहज अभ्यासक्रमाचे संदर्भीकरण
प्रयास आरोग्य गट

सहज अभ्यासक्रमाचे संदर्भीकरण

मुलांना देण्यात येणारी माहिती त्यांच्या संदर्भानुसार बदलणे म्हणजे संदर्भीकरण नव्हे. संदर्भीकरण म्हणजे विशिष्ट संदर्भातील मुलांसोबत काम करताना हीच माहिती अधिक अर्थपूर्ण, सहज समजेल अशा आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित पद्धतीने कशी शिकवता येईल असे मार्ग शोधणे.

PDF · EN
View all resources

प्रशिक्षण आणि कौशल्य विकास

लैंगिकतेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि मुलांसोबत व तरुणांसोबत काम करताना या विषयांवर सहजपणे संवाद साधता यावा यासाठी वेबिनार, कार्यशाळा आणि फेलोशिपच्या माध्यमातून शिकण्याच्या विविध संधी.
फेलोशिप

सहज एज्युकेटर्स फेलोशिप

मुलांसोबत आणि तरुणांसोबत काम करणाऱ्या आणि आपल्या कामात लैंगिकता शिक्षणाचा समावेश करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठीचा एक प्रशिक्षण कार्यक्रम.
फेलोशिपबद्दल अधिक वाचा
वेबिनार

लैंगिकता शिक्षणावरील वेबिनार

लैंगिकता, लिंगभाव, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्य या विषयांवरील प्रयास हेल्थ ग्रुपच्या टीमने घेतलेले वेबिनार पाहा.
वेबिनार पाहा
कार्यशाळा

समुपदेशन आणि लैंगिकता : कार्यशाळा

मानसशास्त्राचे विद्यार्थी आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी लैंगिकतेविषयी समज वाढवणारी आणि अनुभवांतून शिकण्याची संधी
कार्यशाळेविषयी अधिक वाचा
वाचनसूची

प्रशिक्षकांसाठी इतर साहित्य

सर्वंकष लैंगिकता प्रशिक्षकांसाठी वाचनसाहित्य, संशोधन आणि संदर्भ-साहित्य.
संपूर्ण वाचन सूची पहा

आम्हाला सहजची कशी मदत झाली?

“

पाचवीच्या सहजच्या सत्रानंतर काही मुलं-मुली थांबतात. त्यांना खूप काही बोलायचं असतं, विचारायचं असतं, स्वतःचे अनुभव सांगायचे असतात.

एक मुलगी म्हणाली, “या शाळेत शिकते याचा मला अभिमान वाटतो. कारण या महत्त्वाच्या गोष्टी दुसऱ्या कोणत्याच शाळेत शिकवत नाहीत.” दुसरी मुलगी सांगत होती की तिच्या घरात दादा आणि इतर पुरुषांना मासिक पाळीबद्दल फारशी माहिती नाही, म्हणून ती त्यांना याबद्दल सांगते आहे.

शिक्षक
“

“पहिलीच्या वर्गात शरीराच्या अवयवांबद्दल शिकवत असताना, सहजच्या सत्रांमधून शिकलेल्या लिंग, योनी, गुदद्वार आणि स्तन यांसारख्या अवयवांचाही उल्लेख केला. तेव्हा कोणालाही लाज वाटली नाही किंवा कुजबुज झाली नाही.”

शिक्षक

सहज तुमच्या शाळेत राबवायचे आहे?

प्रयासची टीम शाळांसोबत काम करते, ज्याद्वारे 'सहज' कार्यक्रमाला शाळेच्या वेळापत्रकानुसार जुळवून घेतले जाते, शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते आणि पालकांना या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली जाते. आम्हाला तुमच्या शाळेबद्दल सांगा, आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.