शैक्षणिक संसाधने
सहज: अभ्यासक्रम आणि शैक्षणिक उद्दिष्ट्ये
इयत्ता 1 ली ते 10 वी साठीचा सर्वंकष, वयानुरूप आणि विषयांची पुनरावृत्ती करत टप्प्याटप्प्याने पुढे जाणारा (स्पायरल) लैंगिकता शिक्षण अभ्यासक्रम.
सर्वंकष लैंगिकता शिक्षण अभ्यासक्रम
मुलं आणि तरुण दररोज त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या आसपासच्या जगाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतात. जसजशी मुलांची वाढ होते, तसतसे त्यांना त्यांचे शरीर, भावना, मैत्री, नातेसंबंध, आकर्षण आणि होणारे बदल, याबद्दल प्रश्न पडणे नैसर्गिकच आहे.
सहज एज्युकेटर्स फेलोशिप अहवाल 2025-2026
महाराष्ट्रभर लहान मुले व युवांसोबत काम करणाऱ्या व्यक्ती लैंगिकता प्रशिक्षक म्हणून तयार व्हाव्यात यासाठी प्रयास आरोग्य गटाने सहज एज्युकेटर्स फेलोशिप हा 8 महिन्यांचा संमिश्र (ऑनलाईन व ऑफलाईन) स्वरूपाचा प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केला आहे.
सहज अभ्यासक्रमाचे संदर्भीकरण
मुलांना देण्यात येणारी माहिती त्यांच्या संदर्भानुसार बदलणे म्हणजे संदर्भीकरण नव्हे. संदर्भीकरण म्हणजे विशिष्ट संदर्भातील मुलांसोबत काम करताना हीच माहिती अधिक अर्थपूर्ण, सहज समजेल अशा आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित पद्धतीने कशी शिकवता येईल असे मार्ग शोधणे.
सहज– पहिल्या वर्षाची अंमलबजावणी
पहिल्या वर्षाच्या अंमलबजावणीचा उद्देश हा असा पाया तयार करणे आहे, ज्यामुळे त्यानंतरच्या काळात विद्यार्थी सहज कार्यक्रमात अर्थपूर्ण आणि सक्रियपणे सहभागी होऊ शकतील. या मार्गदर्शिकेत दिलेला सत्रांचा क्रम हा बंधनकारक नसून, केवळ मार्गदर्शनासाठी दिलेला आहे.
