Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

सहज तुमच्या शाळेत राबवायचे आहे?

सुरुवात करूया

तुमच्या शाळेला आम्ही कशी मदत करू शकतो?

थोडे मार्गदर्शन हवे आहे?
सहजची ओळख
सहजचा दृष्टिकोन, अभ्यासक्रमाची रचना आणि उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा वापर कसा करायचा, याची माहिती शिक्षकांना आणि शाळेतील नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींना या सत्रातून दिली जाईल.
तुमच्या शिक्षकांना तयार करायचे आहे?
शिक्षक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन
सहजची सत्रे विद्यार्थ्यांसोबत प्रभावीपणे घेण्यासाठी शिक्षकांना आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वास मिळावा, तसेच हा विषय शिकवताना त्यांना सहजता वाटावी, यासाठी सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल.
तुमच्या शाळेच्या संदर्भानुसार अभ्यासक्रम वापरण्यासाठी मदत हवी आहे?
अभ्यासक्रम तुमच्या गरजांनुसार जुळवून घेण्यासाठी मदत
विद्यार्थ्यांचे वयोगट, शाळेचे वातावरण आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन सहजच्या अभ्यासक्रमात योग्य ते बदल कसे करावेत, यासाठी तांत्रिक मार्गदर्शन दिले जाईल. हे बदल करताना अभ्यासक्रमाची मुख्य उद्दिष्टे आणि तत्त्वे कायम ठेवली जातील.
प्रयास टीमने तुमच्या शाळेत सहज कार्यक्रम राबवावा असे वाटते आहे?
शाळेच्या सहभागातून कार्यक्रमाची अंमलबजावणी
विद्यार्थ्यांसोबत सहज कार्यक्रम राबवताना आम्ही शाळेचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, शिक्षक, पालक आणि शाळेशी संबंधित इतर व्यक्तींसोबत काम करू शकतो. यामुळे संपूर्ण शाळेचा सहभाग असलेला दृष्टिकोन विकसित करता येईल. सहज हा शाळेच्या दैनंदिन कामकाजाचा एक भाग व्हावा आणि भविष्यातही शाळेने तो स्वतःहून सुरू ठेवावा, हे यामागचे उद्दिष्ट आहे.
तुमच्या शाळेत सहज सुरू करण्यास उत्सुक आहात?
तुमच्या शाळेबद्दल आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत हवी आहे, याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. यामुळे तुमच्या गरजा समजून घेऊन तुम्हाला योग्य ती मदत कशी करता येईल, हे ठरवता येईल.

तुमच्या शाळा/संस्थेबद्दल माहिती

कोणत्या इयत्तांसाठी तुम्हाला सहज कार्यक्रम राबवायचा आहे?
तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत आमच्याकडून हवी आहे?
=
सहज अभ्यासक्रमात उत्सुकतेने रस दाखवल्याबद्दल धन्यवाद!. सहज टीममधील एक सदस्य तुमच्याशी संपर्क साधेल, तुमच्या गरजा समजून घेईल आणि पुढे काय करता येईल याबद्दल तुमच्याशी चर्चा करेल.