Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
जेव्हा तुमचं मूल प्रश्न विचारतं
३–५ वर्षे
लिंगभाव आणि समानता

मुले बाहुल्यांशी आणि मुली गाड्यांशी खेळू शकतात का?

शेअर करा

काय सांगावं

सांगा: “हो. कोणतेही मूल बाहुल्या, गाड्या, भातुकलीचा खेळ, ठोकळे किंवा चेंडूशी खेळू शकते. खेळणी मजा करण्यासाठी आणि शिकण्यासाठी असतात. एखाद्या खेळण्याशी खेळल्याने तू कोण आहेस ते बदलत नाही.”

जर मूल म्हणाले “हे फक्त मुलीच करतात” किंवा “हे फक्त मुलगेच करतात” तर म्हणा: “काही लोकांना तसे वाटते, पण आपल्या घरात प्रत्येक जण सगळे काही करून बघू शकतो.”

कृतीतूनही दाखवा: मुलांना स्वयंपाकघरात मदत करू द्या आणि मुलींना चेंडूने खेळू द्या (किंवा इत्यादी अश्या प्रकारच्या लिंगभावाविषयीच्या पारंपरिक भूमिका दर्शवणाऱ्या कृती.)

किती सांगावं

छोटे आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तर पुरेसे आहे. त्यानंतर तुमच्या स्वतःच्या घरातील एक उदाहरण द्या, जसे की “बाबाही स्वयंपाक करतात” किंवा “मम्मीही गाडी चालवते” किंवा पारंपरिक लिंगभावाच्या चौकटी मोडणारे दुसरे कोणतेही योग्य उदाहरण द्या. शब्दांपेक्षा कृती जास्त शिकवते.

कोणती मूल्यं रुजवावीत

  • मुलगे-मुलींसाठी समान न्याय
  • अनेक आवडीनिवडी अनुभवण्याचे स्वातंत्र्य
  • दयाळूपणा आणि चिडवाचिडवी न करणे
  • सर्व मुलांना समान आदर

काय बोलू किंवा करू नये

  • मुलग्याला चिडवू नका (“मुलीसारखा का खेळतोस?”). “मुलीसारखे” हा शब्द अपमान म्हणून वापरू नका
  • मैदानी खेळ आवडणाऱ्या मुलीला चिडवू नका
  • खेळण्यांवरून मूल “खरा” मुलगा किंवा “खरी” मुलगी ठरते असे म्हणू नका
  • सामाजिक सवय ही निसर्गाचा नियम असल्यासारखी सांगू नका

पालकांसाठी टिपा

  • मुले घरात जे पाहतात त्याचे अनुकरण करतात: कोण स्वयंपाक करतो, कोण निर्णय घेतो, कोण विश्रांती घेऊ शकतो. हे सर्व संभाषणापेक्षा जास्त शिकवते.
  • नातेवाईकांनी यावर काही टिप्पणी केली, तर तुम्ही शांतपणे म्हणू शकता, “त्यांना जे करायचे ते करू द्या.”
  • वेगवेगळी खेळणी वेगवेगळी कौशल्ये वाढवतात (काळजी घेणे, नियोजन, हालचाल). खेळात विविधता येऊ द्या.
  • मुलाला उलट्या रूढीकडेही ढकलू नका. आपले ध्येय त्यांना निवडीचे स्वातंत्र्य समजणे हे आहे.
  • जर तुमच्या कुटुंबामध्ये हे मेनी नसेल तर तुमचे कुटुंब काय मानते ते तुम्ही सांगू शकता आणि त्याचबरोबर इतर लोक वेगळे असू शकतात हेही मुलाला सांगू शकता.

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा