काय सांगावं
सांगा: “क्रश म्हणजे तुला एखादी व्यक्ती खूप आवडणे आणि तू तिच्याबद्दल वारंवार विचार करणे. ती वर्गमित्र/मैत्रीण असू शकते किंवा टीव्हीवरची एखादी व्यक्ती. मोठे होताना अनेक जणांबद्दल आपल्याला क्रश असू शकतो आणि अशा भावना असणे ठीक आहे. क्रशबद्दल तुला काहीही करण्याची गरज नाही. समोरच्या व्यक्तीचा आदर करायचा हे लक्षात ठेव. समोरच्या व्यक्तीलाही भावना असतात आणि तिला कसे वाटले पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार तिचा आहे.”
विचारा: “हा शब्द तू कुठे ऐकलास?” आणि मूल खरोखर काय विचारत आहे हे समजून त्याचे उत्तर द्या.
किती सांगावं
शब्दाचा अर्थ आणि भावना यांच्यापुरतेच बोला. त्याचे डेटिंगबद्दलच्या चर्चेत रूपांतर करू नका. किती बोलायचे ते मुलाला ठरवू द्या.
कोणती मूल्यं रुजवावीत
- भावना सामान्य आहेत आणि त्यांचे स्वागत आहे
- दयाळूपणा
- कोणीही दुसऱ्या व्यक्तीला प्रेम देण्यास बांधील नाही
- पालकांशी बोलणे सुरक्षित आहे
काय बोलू किंवा करू नये
- चिडवू नका (“ओहो, गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड!”)
- नातेवाईकांना किंवा मित्र-मैत्रिणींना सांगू नका
- “एवढ्या लहान वयात असल्या भावना असू नयेत” असे म्हणू नका
- त्या भावनेनुसार काही करण्यासाठी मुलावर दबाव आणू नका
पालकांसाठी टिपा
- या वयात क्रश बहुतेक वेळा कौतुक किंवा मैत्रीच्या स्वरूपात व्यक्त होतात आणि चित्रपट, गाणी किंवा वर्गमित्रांचे बोलणे याचा त्यावर प्रभाव असतो.
- कोणीतरी “आय लव्ह यू” म्हटले किंवा चिठ्ठी पाठवली असे मुलाने सांगितले, तर शांत राहा, त्यांना कसे वाटले ते विचारा आणि त्यांना त्या चिठ्ठीला उत्तर देण्याची गरज नाही हे सांगा.
- मोठ्यांनी चिडवल्याने मुले भावना लपवायला शिकतात, मुले मोठी झाल्यावरही ती उघडपणे व्यक्त होत नाहीत.
- आत्ताची तुमची शांत प्रतिक्रिया पुढे किशोरवयातील प्रश्नांसाठीची वाट सोपी करते.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा