Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
जेव्हा तुमचं मूल प्रश्न विचारतं
९–११ वर्षे
लिंगभाव आणि समानता

माझा भाऊ संध्याकाळी बाहेर खेळायला जाऊ शकतो, पण मी का नाही?

शेअर करा

काय सांगावं

म्हणा: “तुलाही इतर कोणाहीप्रमाणे न्याय्य संधी मिळायलाच हव्यात. मला तुझ्या सुरक्षिततेची काळजी वाटते, पण ते तू कमी सक्षम किंवा कमी महत्त्वाची आहेस म्हणून नाही. जग नेहमी सुरक्षित नसते आणि अनेक कुटुंबांना मुलींची जास्त काळजी वाटते. पण त्यावरचे उत्तर मुलींवर बंधने घालणे हे नसावे. ते जग, सर्व ठिकाणे, सर्व वेळांना अधिक सुरक्षित करणे आणि मुलग्यांसह सर्वांना इतरांचा आदर करायला शिकवणे हे असावे. जर तुला कोणी असुरक्षित वाटायला लावले तर त्यात तुझी काहीच चूक नाही. तसेच तुझ्याबाबतीत कोणत्याही प्रकारची हिंसा घडली तर आम्ही तुझ्यासोबत असू.

चल, आपण तुम्हा दोघांसाठी नियम न्याय्य करूया. सुरक्षित वेळा, ठिकाणे, तू कोणासोबत जाशील आणि मला कशी माहिती देशील हे आपण एकत्र ठरवू शकतो आणि ते नियम दोघांसाठीही असतील. तू मोठी होशील तसे नियम बदलू शकतात.”

किती सांगावं

तुम्हाला काळजी वाटते याबद्दल प्रामाणिक राहा आणि नियम सुरक्षिततेसाठी आहेत, तुमच्या मुलाच्या मूल्याबद्दल नाहीत, हे सांगा. एकत्र योजना आखण्याची, नियम बदलण्याची, ते न्याय्य करण्याची तयारी दाखवा. एक छोटी चर्चा पुरेशी आहे, आणि मग छोट्या छोट्या कृतींमधून ते अंमलात आणा.

कोणती मूल्यं रुजवावीत

  • न्याय
  • सर्व मुलांसाठी सुरक्षितता
  • विश्वास आणि जबाबदारी वयानुसार वाढतात, बदलतात
  • मुली आणि मुलगे यांचा आदर

काय बोलू किंवा करू नये

  • “असे आहे कारण तू मुलगी आहेस” हे कारण म्हणून सांगू नका
  • मुलीच्या वर्तनाला कुटुंबाच्या “इज्जती”शी जोडू नका
  • छळवणुकीसाठी मुलींच्या कपड्यांना किंवा वर्तनाला दोष देऊ नका
  • मुलग्यांना मोकळीक व मुलींवर त्यांच्या वर्तनाची जबाबदारी असे करू नका
  • मुलीच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका

पालकांसाठी टिपा

  • अनेक मुलींना हा अन्याय जाणवतो आणि त्या हा प्रश्न विचारणे थांबवतात. पण त्याबद्दल बोलल्याने, त्याची दखल घेतल्याने तुम्हाला ते समजते आहे हे त्यांना कळते.
  • भावांना आणि मुलग्यांनाही मुलींचा आदर करणे, चिडवाचिडवी न करणे आणि एखादा मित्र कोणाला त्रास देत असेल तर काय करायचे हे शिकवा.
  • तुमच्या मुलांना सुरक्षा योजनेत सहभागी करा: एखाद्या ठिकाणी जाताना गटाने एकत्र जा, विश्वासू मोठ्या व्यक्तीसोबत लोकेशन शेअर करा, चार्ज केलेला फोन सोबत ठेवा ह्या गोष्टी सांगा.
  • सुरक्षिततेसाठी तुम्ही एखाद्या गोष्टीची परवानगी देऊ शकत नसाल, तर कारण समजावून सांगा आणि पुढे ती कशी शक्य होऊ शकेल तेही सांगा.
  • वय आणि परिपक्वतेनुसार बनलेले व बदललेले, मुलगा व मुलगी दोहोंसाठीचे न्याय्य नियम फक्त लिंगावर आधारित नियमांपेक्षा अवलंब करण्यास सोपे असतात.