Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
जेव्हा तुमचं मूल प्रश्न विचारतं
१५–१८ वर्षे
लिंगभाव आणि समानता

मला माझ्याच लिंगाची एखादी व्यक्ती आवडली तर?

शेअर करा

काय सांगावं

सांगा: “याबद्दल बोलण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. विरुद्ध लिंगाबद्दल, समान लिंगाबद्दल, दोन्हीं लिंगांबद्दल किंवा कोणाहीबद्दल आकर्षण वाटणे (किंवा कोणाचबद्दल आकर्षण न वाटणे) हा मानवी विविधतेचा सामान्य भाग आहे. तो आजार नाही, तू स्वतः निर्माण केलेला टप्पा नाही आणि कोणाचीही कोणतीही चूक नाही. तुला स्वतःला कोणतेही लेबल लावण्याची किंवा आत्ता काही ठरवण्याची गरज नाही. तुला जे काही वाटते ते ठीक आहे, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याजवळ सुरक्षित आहेस.

महत्त्वाचे काय आहे तर: स्वतःचा आणि इतरांचा आदर ठेवणे, संमती आणि सुरक्षित आरोग्यपद्धती. काही लोक याबद्दल चुकीच्या पद्धतीने वाईट प्रतिक्रिया देऊ शकतात, म्हणून तू कोणाला काय सांगायचे ते काळजीपूर्वक ठरव. भारतात, सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये म्हटले की समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही. तुला एखाद्या समुपदेशकाशी किंवा तुझ्यासारख्या इतरांशी बोलायचे असेल, तर सुरक्षित गट आणि हेल्पलाइन उपलब्ध आहेत.”

किती सांगावं

तुमच्या मुलाने स्वतःबद्दल हे सांगितले, तर पहिले पाऊल म्हणजे ऐकून घेणे आणि प्रेमाने उत्तर देणे. आत्ताच सगळी माहिती सांगण्याची गरज नाही. त्यांना धन्यवाद म्हणा, कोणताही निर्णय देऊ नका, त्यांना कोणता आधार हवा आहे ते विचारा, त्यांनी सांगितलेले गोपनीय ठेवा आणि नंतर पुन्हा बोला. प्रश्न सर्वसाधारण असेल, तर दोन वाक्यांत उत्तर द्या.

कोणती मूल्यं रुजवावीत

  • प्रेम आणि स्वीकार
  • सर्वांसाठी आदर आणि प्रतिष्ठा
  • सुरक्षितता आणि गोपनीयता
  • मूल ही कोणी दुरुस्त करण्याची समस्या नाही

काय बोलू किंवा करू नये

  • “हा एक टप्पा/ फेझ आहे, नंतर बदलेल”, “हे पाश्चात्त्य आहे” किंवा “तू आजारी आहेस” असे म्हणू नका ते खरे नाही.
  • त्यांना “बरे” करण्याचा किंवा त्यांचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न करू नका. कन्व्हर्जन थेरपी, धार्मिक “उपचार” आणि जबरदस्तीचे लग्न व्यक्तीच्या आयुष्याची हानी करतात
  • त्यांच्या परवानगीशिवाय इतरांना सांगू नका
  • धमकी देऊ नका किंवा दुर्लक्ष करू नका

पालकांसाठी टिपा

  • हे सांगणाऱ्या मुलाने मोठी जोखीम घेतलेली असते. तुम्हाला धक्का, भीती किंवा दुःख वाटू शकते. या भावना सामान्य आहेत, त्या वाटल्यास मुलावर दोष म्हणून न टाकता समुपदेशक किंवा विश्वासू मोठ्या व्यक्तीशी शेअर करा.
  • कुटुंबाने केलेला स्वीकार मानसिक आरोग्याचे संरक्षण करतो. नाकारल्याने नैराश्य आणि स्वतःला इजा करण्याचा धोका खूप वाढतो.
  • तुमचे मूल अजूनही शोध घेत असू शकते. लेबल लावू नका किंवा लेबल ठरवण्यासाठी मुलावर दबाव टाकू नका.
  • अनेक शहरांमध्ये LGBTQ-स्नेही समुपदेशक आणि समुदाय गट आहेत. विश्वासू डॉक्टर किंवा NGO चा सल्ला घ्या.

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा