Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
जेव्हा तुमचं मूल प्रश्न विचारतं
१२–१४ वर्षे
लिंगभाव आणि समानता

कोणी स्वतःला ट्रान्सजेंडर म्हणत असेल तर त्याचा अर्थ काय?

शेअर करा

काय सांगावं

सांगा: “काही लोकांना वाटते की त्यांचा लिंगभाव – म्हणजे ते स्वतःला मुलगा समजतात की मुलगी की याहून वेगळे काही, हे जन्माच्या वेळी त्यांना सांगितलेल्या लिंगाशी जुळते तर काही लोकांना नैसर्गिकपणे वाटते की त्यांचा लिंगभाव (म्हणजे ते स्वतःला कुठल्या लिंगभावाचे समजतात ते) जन्माच्या वेळी सांगितलेल्या लिंगापेक्षा (शारीरिक लिंग) वेगळा आहे. ते स्वतःला ट्रान्सजेंडर म्हणू शकतात. ट्रांसजेंडर्स जगभरात सर्व ठिकाणी आहेत. भारतामध्ये हिजडा, जोगती यांसारखे समुदाय शतकानुशतके अस्तित्वात आहेत. पण ट्रान्सजेंडर असणे म्हणजे अश्या एखाद्या समुदायाचा भाग असणे अनिवार्य नाही. ट्रान्सजेंडर असणे हा कुठला आजार, आयुष्यातला एक टप्पा किंवा व्यक्तीने स्वतः केलेली निवड नाही, ती नैसर्गिक गोष्ट आहे आणि वाईट पालकत्वामुळे कोणी ट्रान्सजेंडर होत नाही. त्याबद्दल कुणाला किंवा स्वतःला दोष देणे योग्य नाही. इतर सर्वांप्रमाणेच ट्रान्सजेंडर लोकांनाही आदर, प्रतिष्ठा, सन्मान मिळायला हवा.

आपली लिंगभावाची ओळख म्हणजे आपण स्वतःला कोणत्या लिंगभावाचे समजतो ते, आपल्याला कोणते कपडे कपडे घालायला आवडतात किंवा छंद आवडतात किंवा कोणाबद्दल आकर्षण वाटते यापेक्षा वेगळे असते.”

किती सांगावं

काही वाक्यांत व्याख्या सांगा. मूल जो प्रश्न विचारेल त्याचे उत्तर द्या. तुमचे मूल एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल विचारत असेल, तर त्या व्यक्तीच्या ओळखीबद्दल अंदाज बांधू नका.

कोणती मूल्यं रुजवावीत

  • आदर आणि सर्वसमावेशकता
  • अचूकता
  • दादागिरी नसणे
  • प्रत्येकाला प्रतिष्ठा मिळायला हवी

काय बोलू किंवा करू नये

  • थट्टा करू नका किंवा अपमानास्पद शब्द वापरू नका
  • “हे पाश्चात्त्य आहे” किंवा “हा विकार आहे” असे म्हणू नका
  • तुमच्या मुलाला एखाद्या व्यक्तीपासून दूर राहायला सांगू नका
  • इतर लोकांच्या ओळखीबद्दल अंदाज बांधू नका
  • तुमच्या मुलावर कठोर लिंगभावाचे नियम लादू नका

पालकांसाठी टिपा

  • मुलांचा एखादा वर्गमित्र, नातेवाईक किंवा ते स्वतः यावर विचार करत असल्याने किंवा त्याविषयी संवाद करत असल्याने मूल हा प्रश्न विचारत असेल. संशयाने “तू ट्रांसजेंडर आहेस का?” असे विचारू नका. म्हणा: “तुला जे काही वाटते ते तू मला सांगू शकतेस/शकतोस आणि तू सुरक्षित असशील.”
  • भारतीय कायदा ट्रान्सजेंडर व्यक्तींचे हक्क मान्य करतो (सर्वोच्च न्यायालयाचा २०१४ चा निकाल, ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा २०१९).
  • एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत नसेल, तर म्हणा “चल, आपण एकत्र शिकूया.”
  • या कारणावरून होणारी दादागिरी किंवा चिडवाचिडवी घरात, शाळेत आणि ऑनलाइन अस्वीकारार्ह आहे.