Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
जेव्हा तुमचं मूल प्रश्न विचारतं
१२–१४ वर्षे
मोठे होणे आणि यौवनावस्था

माझ्या शरीरात बदल होत आहेत आणि मला संकोचल्यासारखे वाटते. हे सामान्य आहे का?

शेअर करा

काय सांगावं

सांगा: “हो, हे अगदी सामान्य आहे. तुझे शरीर यौवनावस्थेतून जात आहे. प्रत्येक व्यक्ती या वयात हे बदल अनुभवते. या वयामध्ये शरीरे प्रजननासाठी तयार होण्यासाठी जे बदल करत असतात, त्यासाठी तयार होणाऱ्या हॉर्मोन्समुळे हे बदल होतात. प्रत्येकामध्ये होणाऱ्या बदलांमध्ये आणि ते सुरू होण्याच्या काळामध्ये फरक असतात. होणारे बदल पुढीलप्रमाणे असू शकतात:

  • सर्वांमध्ये होणारे बदल : उंची झपाट्याने वाढणे, घाम येणे आणि शरीराचा वास बदलणे, पिंपल्स येणे, काखेत आणि जननेंद्रियांवर केस येणे, मनःस्थितीतील बदल आणि नवीन भावना निर्माण होणे.
  • मुलींमध्ये होणारे बदल : स्तन वाढतात, कंबर रुंद होते, मासिक पाळी सुरू होते, आणि योनीमार्गातून स्वच्छ पांढरा स्राव येऊ शकतो. हे सामान्य आहे.
  • मुलग्यांमध्ये होणारे बदल : आवाज घोगरा होतो, चेहऱ्यावर केस येतात, शिश्न आणि वृषण वाढतात, लिंगास ताठरता (erection) येते, आणि स्वप्नावस्था (झोपेत वीर्य बाहेर पडणे) होऊ शकते.

यापैकी काहीही घाणेरडे किंवा चुकीचे नाही. रोज अंघोळ कर, स्वच्छ अंतर्वस्त्रे घाल, आणि आवडत असेल तर डिओडरंट वापर. मला किंवा डॉक्टरांना कोणताही प्रश्न विचार.”

किती सांगावं

तुमच्या मुलासाठी आत्ता जे लागू पडते आहे ते सांगा. मुलगे आणि मुली दोघांनाही दुसऱ्या लिंगाबद्दलची मूलभूत माहिती द्या, म्हणजे ते एकमेकांशी आदराने वागतील. सगळे एकदम सांगू नका; एकावेळी पाच ते दहा मिनिटांच्या चर्चा चांगल्या ठरतात. विचारा “तुला सर्वात जास्त कशाची काळजी वाटते?”

कोणती मूल्यं रुजवावीत

  • शरीराचा स्वीकार
  • गोपनीयता आणि आदर
  • चिडवाचिडवी नसणे
  • प्रश्नांसाठी खुलेपणा

काय बोलू किंवा करू नये

  • त्यांच्यात घडणाऱ्या बदलांबद्दल विनोद करू नका (“बघा, मिशी आली!”, “आता तू मोठा झालास!” इत्यादी)
  • इतरांशी तुलना करू नका
  • संकोच वाटण्याकडे किंवा काळजीकडे दुर्लक्ष करू नका
  • भीतीपोटी अचानक बंधने घालू नका
  • त्यांनी विचारण्याची वाट पाहू नका, तुम्ही संवाद सुरू करा

पालकांसाठी टिपा

  • व्यावहारिक मदत: मुलींसाठी पॅड आणि शाळेत नेण्यासाठी किट द्या, नीट बसणारी अंतर्वस्त्रे आणि ब्रा द्या, डिओडरंट आणि स्वच्छ टॉवेल द्या.
  • स्वप्नावस्थेसाठी मुलाचे कपडे बदलण्यास आणि धुण्यास मदत करा, त्याची लाज वाटू देऊ नका व तुम्हीही बाळगू नका. योनीमार्गातील स्रावाला वाईट वास येत असेल, खाज येत असेल किंवा तो हिरवा किंवा पिवळा असेल तर डॉक्टरांना दाखवा.
  • यौवनावस्थेमुळे मनःस्थितीत चढउतार होतात. तीव्र भावना असणे सामान्य आहे मात्र मुलांचे दुःख किंवा राग दोन आठवड्यांहून जास्त टिकला किंवा त्याचा शाळेवर परिणाम झाला तर समुपदेशक किंवा डॉक्टरांशी बोला.
  • बदल खूप लवकर (सुमारे ८ च्या आधी) सुरू झाले, किंवा सुमारे १४ पर्यंत सुरू झाले नाहीत (१५ पर्यंत पाळी आली नाही), तर डॉक्टरांना दाखवा.
  • शक्य वाटत असेल तर समान लिंगाच्या मोठ्या व्यक्तीला त्यांच्याशी बोलायला सांगा आणि या विषयावरील एखादे पुस्तक द्या.

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा