Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

shanka

शेअर करा
प्रश्न

sex kelyanantar patnichya yoni madhe tras hoto

उत्तरे (1)

उत्तर
August 14, 2018

आपल्या जोडीदाराशी बोला. संवाद वाढवा. त्यांना कशाचा त्रास होतो ते पहा आणि मग त्यावर उपाय शोधा. लिंगप्रवेशी संबंधात अनेकदा घर्षणातून वेदना होतात. खरंतर योनी मार्गातून येणाऱ्या स्त्रावांमुळे संबंध सुखकर होत असतात. पण इच्छा नसणे, पुरेशी उत्तेजना न मिळणे या कारणामुळे हे स्त्राव तयार होत नाहीत आणि वेदना होतात. आनंददायी लैंगिक संबंधासाठी खाजगी जागा, निवांतपणा, स्वच्छता, इच्छा, तणावरहित मन, प्रेम, पुरेशी जवळीकता या अत्यावश्यक गोष्टीसोबातच फोरप्ले (जवळ घेणे, चुंबन, बातचीत, स्पर्श, मिठी ई) ह्या घटकांना कमालीचे महत्व आहे. तुम्ही या फोर प्लेसाठी किती वेळ देता? नसेल तर तसा वेळ द्या आणि पहा.. आणि तरीही जर होणारा त्रास कमी नाही झाला तर स्त्रीरोग तज्ञांना भेटा.

खाली काही लिंक्स देत आहोत त्यावरील लेख वाचा

https://letstalksexuality.com/sexual-pleasure/

https://letstalksexuality.com/foreplay/

https://letstalksexuality.com/sexual-pleasure-2/