Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

मी आणि माझी प्रेयसी लग्न करण्याच्या विचारात आहोत पण आमचा रक्तगट एकच आहे…

शेअर करा
प्रश्न

मी आणि माझी प्रेयसी लग्न करण्याच्या विचारात आहोत पण आमचा रक्तगत एकच आहे…बऱ्याच जनांकडून ऐकल आहे की रक्तगत एक असल्यामुळे पुढे वैवाहिक जीवनात प्रोब्लेम असतो…रक्तगत एक असल्यामुळे आमच्या लैंगिक जीवनावर काय परिणाम होउ शकतो का

उत्तरे (2)

उत्तर
April 28, 2017

हा अनेक लोकांमध्ये आढळणारा गैरसमज आहे पण त्यात काहीही तथ्य नाही. समान रक्तगट असण्याचा आणि लैंगिक जीवन किंवा मुल होणं न होणं याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

रक्तगटासंबंधित एकमेव प्रश्न उद्भवू शकतो तो म्हणजे जर आईचा रक्तगट आरएच निगेटिव्ह (Rh negative) असेल आणि जर तीला आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर मात्र आईला पहिल्या बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर ४८ तासांच्या आत एक इंजेक्शन घ्यावे लागते. जर इंजेक्शन घेतले नाही तर आईला ऍन्टीबॉडीज म्हणजेच काही विशिष्ट प्रकारच्या री-अॅक्शन येऊ शकतात. तसेच जर तीला पुन्हा पुढच्या वेळी देखील आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर त्या बाळावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.

पुन्हा एकदा आवर्जून नमूद करावेसे वाटते की समान रक्तगट असणाऱ्या किंवा रक्तगट आरएच निगेटिव्ह (Rh negative) रक्तगट असणाऱ्या पालकांना मुल होण्यात काहीही अडचण येत नाही.

त्यामुळे चिंता करण्याचे काहीही कारण नाही. तुमच्या दोघांनाही सहजीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. आणखी काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.

उत्तर
July 18, 2017