Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

सेक्स: माझे वय 30 आहे, मी 18 किंवा 19 वर्षाच्या मुलीशी लग्न केले तर सेक्स विषयी भविष्यात काही अडचणी येतील का?

शेअर करा
प्रश्न

यापूर्वी विचारलेला हा प्रश्न दिसत नाही

माझे वय 30 आहे, मी 18 किंवा 19 वर्षाच्या मुलीशी लग्न केले तर सेक्स विषयी भविष्यात काही अडचणी येतील का?

उत्तरे (1)

उत्तर
July 19, 2017

तुम्ही दोघेही एकमेकांसोबत कम्फर्टेबल असाल, एकमेकांसाठी पूरक असाल तर आणि या नात्यासाठी दोघांचीही संमती असेल तर काहीच अडचण येणार नाही. स्त्री-पुरुष लैंगिक क्रियांचा आनंद वयाच्या साठ-सत्तराव्या वर्षापर्यंत घेऊ शकतात. हा अनुभव प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न असू शकतो.

हे खरे आहे की स्त्री पुरुषांमध्ये जसजसे वय वाढत जाते तसतशी लैंगिक क्रियांमधील इच्छा कमी होत जाते. पुरुषांमध्ये लैंगिक इच्छेसाठी कारणीभूत असलेल्या हार्मोनचे (testestron) प्रमाण कमी होत जाते परंतु ते तयार होणं कधीच थांबत नाही. काही पुरुषांमध्ये हार्मोनचे प्रमाण कमी झाले तरी ते ७० व्या वर्षीही काही प्रमाणात ‘कार्यरत’ दिसतात. मात्र ताणताणाव, कामाचा व्याप, औषधांचा परिणाम किंवा कंटाळा ही कारणं सेक्स मधील इच्छा कमी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.

हे स्त्रियांसाठीही लागू आहे. वाढत्या वयानुसार हार्मोन्सचा प्रभाव जसजसा कमी होत जातो तसतशी लैंगिक क्रियांमधील इच्छा कमी होत जाणे हे साहजिक आहे. परंतु नाते संबंधातील तानतणाव, कामाचा बोजा, मानसिक त्रास, हिंसा आणि छळ इत्यादी कारणं ही प्रक्रिया वेगाने करण्यास कारणीभूत ठरू शकतात.

निरोगी जीवनशैली, व्यायाम, आहारावर नियंत्र आणि तणावरहित नातेसंबंध असतील तर उतरत्या वयातही लैंगिक जीवन सक्रीय आणि तितकेच आनंददायी असू शकते.

इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दोघांचीही या नात्यासाठी संमती आणि तुम्ही एकमेकांसाठी पूरक असणं.