Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

मासिकपाळीच्या किती दिवस आधी आणि किती दिवस नंतर सेक्स केल्याने गर्भधारणा होऊ शकते?

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
March 15, 2016

मासिक पाळीच्या चक्रामधल्या काही दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. प्रत्येक स्त्रीसाठी पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. साधारणपणे पुढची पाळी येण्याच्या आधी 2 आठवड्याच्या सुमारास अंडोत्सर्जन होते. म्हणजेच स्त्रीच्या बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येते आणि बीजवाहिनीमध्ये 12-24 तास जिवंत राहते. या काळात जर पुरुष बीजाशी त्याचा संपर्क झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. या विषयी अधिक माहिती गर्भधारणा नक्की कशी होते या लेखामध्ये दिली आहे.
त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://letstalksexuality.com/conception/