Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

माझ वय २२ आहे. मला हस्तमैथुन करण्याची सवय लागली आहे. सुरवातीली बर वाटायच पण आता ञास व्हायला लागला आहे .दिवस भर मनात तेच विचार मनात चालत असतात. झोप नीट होत नाही, स्वप्न पण तशीच पडतात. हे अस गेली ८ वर्ष चाललय. मला तुम्हाला भेटायचे आहे.

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
January 31, 2017

हस्तमैथुन करण्यामध्ये वाईट असं नक्कीच काही नाही. उलट हस्तमैथुनामुळं लैंगिक भावनांना वाट मोकळी करुन देता येते.

तुमच्या प्रश्नांवरुन असं लक्षात येत आहे की तुम्ही खूपच एकटे आहात. कदाचित काही गोष्टींचा ताण तुम्हाला असावा. एकटेपणा घालवण्यासाठी सतत लैंगिक गोष्टींचा विचार करुन हस्तमैथुन केलं जाऊ शकतं. अशावेळी एकटं बसणं किंवा राहणं यापेक्षा मित्र मैत्रिणींना भेटला तर जास्त फायदा होईल. त्यांच्याशी गप्पा मारा. कवितांची, कांदबर्‍यांची पुस्तकं वाचा. छंद जोपासा. अशामुळं तुमचं मन इतर कामांमध्ये गुंतेल आणि तुमचा एकटेपणा कमी होईल. एकटेपणा कमी झाला की आपोआप हस्तमैथुन सवयीपेक्षा आनंदासाठी केलं जाईल.

आम्हाला भेटण्यासाठी आमचा पत्ता वेबसाईटच्या खालील बाजूस दिला आहे.