पत्नीला खुप लैगींक सुख द्यायचंय त्यासाठी काय करु काहीही अनुभव नाहीये माहीती द्या सर
उत्तरे (1)
खरेतर आपल्या समाजामध्ये स्त्रियांच्या लैंगिक इच्छेचा, आनंदाचा, लैंगिक सुखाचा किंवा त्यांच्या एकूणच लैंगिकतेबद्दल फारच कमी दाखल घेतली जाते. बऱ्याचदा स्त्री लैंगिकसंबंधांमध्ये तृप्त किंवा समाधानी झाली की नाही, याचा विचार पुरुष करत नाहीत. एखाद्या स्त्रीने लैंगिक इच्छा व्यक्त केल्या तर तिच्याकडे वेगळ्या दृष्टीनेही पाहिले जाते किंवा त्याचे नकारात्मक अर्थही काढले जातात.यामुळेच स्त्रिया मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. म्हणूनच याविषयी तिच्याशी बोलणे अपेक्षित आहे. लैंगिक जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक सुखाचा आणि आनंदाचा विचार करणे गरजेचे असते.
स्त्री लैंगिकदृष्टया उत्तेजित झाल्यानंतर सेक्स दरम्यान लैंगिक सुखाचा उच्चतम बिंदू आला की, तिच्या जननेंद्रियांच्या अवतीभोवतीचे स्नायू आकुंचन पावतात व ती लैंगिक सुखाच्या लहरी अनुभवते. एकच नाही तर एका मागोमाग एक अशा अनेक लहरी ती अनुभवू शकते.
स्त्रीला उत्तेजित व्हायला पुरुषापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे दोघांना जवळपास एकाचवेळी परमोच्च लैंगिक सुखाचा बिंदू अनुभवणं अवघड होतं. यासाठी ‘फोरप्ले’ म्हणजे संभोगाआधी एकमेकांना पूर्णपणे उत्तेजित करणे गरजेचे असते. याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
प्रत्येकाची लैंगिक सुखाची, तृप्तीची कल्पना वेगळी असू शकते त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला काय आवडते हे एकमेकांशी संवाद साधून शोधा.
अगोदर एकमेकांची चांगली ओळख करून घ्या. बोला. एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घ्या. घाईची आवश्यकता नाही. शरीर संबंध, गर्भधारणा, निरोधन ह्या बद्दल दोघांनी मिळून माहिती मिळवा, एकमेकांना सांगा, विचारा. मूल कधी हवे आहे, हवे की नको, कुटुंब नियोजन या मुद्द्यांवर एकमेकांची मतं जाणून घ्या, त्यांचा आदर करा. गर्भ निरोधानावर सल्ला घ्या.
‘फोरप्ले’ विषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/foreplay/
लैंगिक सुखास पूरक घटक हा लेख वाचण्यासाठी खालील लिंक देत आहोत. या लिंकवर क्लिक करा.
