Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

जर एकापेक्षा जास्त मुलींबरोबर पण ज्यातील कुणालाच एड्स नाहीय तर एड्स होऊ शकतो का

शेअर करा
प्रश्न

जर hiv नसलेल्या नॉर्मल 1 पेक्षा जास्त व्यक्तींशी असुरक्षित सेक्स केल्यास hiv होऊ शकतो का ?

उत्तरे (1)

उत्तर
July 19, 2017

ज्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध आलेत त्या व्यक्तीला जर एच. आय. व्ही./ एड्सची लागण झालेली नसेल तर संसर्ग होत नाही. परंतु जर त्या व्यक्तीला एच. आय. व्ही./ एड्स आहे अशा एकाजरी व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबध आला तर एच. आय. व्ही होण्याचा धोका वाढतो. एखाद्या व्यक्तीकडे पाहून ती एच. आय. व्ही बाधित आहे कि नाही हे सांगता येत नाही. समोरच्या व्यक्तीला एच. आय. व्ही./ एड्स आहे की नाही हे ओळखण्याचा एच. आय. व्ही. टेस्ट व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग नाही. म्हणूनच जास्त व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबध ठेवले तर लैंगिक संबंधातून पसरणारे आजार पसरण्याची शक्यता असते. म्हणूनच सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे कधीही चांगले.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे-

• निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,

• दूषित रक्त आणि

• प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

एच. आय. व्ही./ एड्सची सविस्तर माहिती खालील लिंकवर दिली आहे.

https://letstalksexuality.com/hiv_aids/