Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

आम्ही रोज सात, आठ वेळा सेक्स करतो काही परिनाम होईल का आरोग्यावर

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
November 11, 2017

केवळ स्कोर करण्याच्या दृष्टीतून सेक्सकडे पाहत आहात असे तर नाही ना? यासाठी तुमच्या जोडीदाराची देखील तितकीच इच्छा आणि संमती आहे का? दोघांच्याही आनंदाचा विचार केला जातो का?

खरेतर कोणी कितीवेळा सेक्स करावा ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे. पहिल्यांदा तुमच्या डोक्यामध्ये सेक्स बद्दलच्या काय कल्पना आहेत त्या तपासून पाहा. सेक्स आयुष्यातील महत्वाचा भाग आहे तरीदेखील सतत सेक्स संबंधीचे विचार येणं योग्य नाही. केवळ सात, आठ, नऊ, दहा वेळा सेक्स असे आकडे वाढविण्यात काहीही अर्थ नाही. रोज कितीदा सेक्स केला यापेक्षा त्यातून मिळणारा आनंद याबद्दल विचार करणे योग्य ठरेल.

एकमेकांशी बोलून दोघांनाही आवडतील, झेपतील असे लैंगिक सुखाचे मार्ग शोधा. लैंगिक संबंध आयुष्यात महत्वाचे आहेच पण सेक्सशिवाय इतर कशातूनच आनंद मिळत नाही अशी स्थिती मात्र येऊन देऊ नका.