Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत असावे

या वेबसाइटवरील बहुतांश आशय प्रशिक्षक, पालक, किशोरवयीन आणि तरुण व्यक्ती यांच्यासाठी तयार करण्यात आला आहे. काही विषय आणि संसाधने १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी अधिक योग्य आहेत. अशा ठिकाणी वयोगटासंबंधी सूचना दिलेल्या असतील.

लैंगिकता हा बहुआयामी आणि संवेदनशील विषय असल्याने, वेबसाइटचा वापर करण्यापूर्वी आम्ही काही भूमिका स्पष्ट करू इच्छितो.

  • कोणत्याही स्वरूपातील हिंसा, जबरदस्ती, लैंगिक छळ, बलात्कार, छेडछाड, बालकांचे लैंगिक शोषण किंवा कोणाच्याही संमतीविरोधात केलेले अश्लील चित्रण आणि त्याचे प्रसारण यांचा आम्ही तीव्र निषेध करतो.
  • लहान मुले-मुली, स्त्रिया तसेच कोणत्याही लिंगभावाच्या व्यक्तींविरुद्ध होणारी हिंसा आणि अशा हिंसेला खतपाणी घालणाऱ्या कृतींचे चित्रण व प्रसारण यांना आमचा सक्त विरोध आहे.
  • जात, धर्म, लिंग, लैंगिकता, भाषा, प्रांत, शारीरिक किंवा मानसिक क्षमता इत्यादी कोणत्याही कारणावरून केला जाणारा भेदभाव आम्हाला मान्य नाही.
  • प्रत्येक व्यक्तीची लैंगिकता आणि तिची अभिव्यक्ती वेगवेगळी असते. स्वतःच्या लैंगिकतेविषयीचे निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला आहे, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
  • लैंगिकतेविषयी योग्य आणि शास्त्रीय माहिती मिळणे, तसेच त्याकडे निरोगी, सकारात्मक आणि भेदभावविरहित दृष्टिकोनातून पाहण्याची समज किशोरवयीन आणि तरुण व्यक्तींमध्ये विकसित होणे गरजेचे आहे, असे आम्हाला वाटते.

वापरासंदर्भातील अटी

या वेबसाइटवरील मजकूर आणि संसाधने विनानफा तत्त्वावर कोणालाही वापरता येतील. मात्र, असा वापर करताना ‘स्रोत: Let’s Talk Sexuality by Prayas Health Group’ असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.

या वेबसाइटवरील माहिती आणि संसाधने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे या साहित्याचा विनानफा वापर आणि प्रसार करण्यास आम्ही प्रोत्साहन देतो. मात्र, त्यासाठी वरीलप्रमाणे स्रोताचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

वेबसाइटवर वापरकर्त्यांनी विचारलेले प्रश्न, इतरांनी केलेले लेखन किंवा त्यावरील टिप्पण्यांमधील प्रत्येक विचाराशी संस्था सहमत असेलच असे नाही. वेबसाइटवरील आशयाचे संपादन करण्याचा, तो प्रसिद्ध न करण्याचा, बदलण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार संस्थेकडे राहील.

प्रश्न आणि उत्तरांविषयी महत्त्वाची सूचना

या विभागात लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्य यांविषयी लोकांनी विचारलेले प्रत्यक्ष प्रश्न आणि ‘प्रयास’ टीमने दिलेली उत्तरे आहेत. यातील काही प्रश्नांमध्ये शरीर, लैंगिक संबंध, वैयक्तिक अनुभव आणि कठीण प्रसंगांविषयी मोकळेपणाने चर्चा केलेली आहे. त्यामुळे काही मजकूर वाचताना अस्वस्थ वाटू शकते.

हा विभाग पुढे वाचण्यापूर्वी कृपया खालील गोष्टी लक्षात घ्या:

  • हा विभाग केवळ १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी आहे.
  • येथे दिलेली उत्तरे केवळ माहिती आणि मार्गदर्शनासाठी आहेत. ती डॉक्टर, समुपदेशक किंवा वकिलांच्या वैयक्तिक सल्ल्याला पर्याय ठरू शकत नाहीत.
  • येथे मांडलेले प्रश्न नावे आणि ओळख उघड होणार नाही अशा पद्धतीने सादर केले आहेत. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींच्या गोपनीयतेचा आणि वैयक्तिक अनुभवांचा आदर करणे अपेक्षित आहे.
  • हा मजकूर वाचण्याचा निर्णय तुम्ही स्वतःहून घेत आहात. काही विषय संवेदनशील किंवा अस्वस्थ करणारे असू शकतात, याची जाणीव ठेवूनच पुढे वाचा.