प्रशिक्षकांसाठी
सहज एज्युकेटर्स फेलोशिप
तरुणांशी लैंगिकतेबद्दल मोकळेपणाने, आत्मविश्वासाने आणि काळजीपूर्वक संवाद कसा साधावा हे शिकण्याची संधी.
या फेलोशिपची सुरुवात का व कशी झाली?
पुण्यातील 'प्रयास आरोग्य गट' (PHG) तर्फे लहान मुलांसोबत आणि किशोरवयीन मुला-मुलींसोबत काम करणाऱ्या आणि आपल्या कामात 'सर्वंकष लैंगिकता शिक्षण' (Comprehensive Sexuality Education - CSE) समाविष्ट करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम.
ही फेलोशिप कोणासाठी आहे?
जर तुम्ही लहान मुलांसोबत आणि किशोरवयीन मुला-मुलींसोबत काम करत असाल, तर ही फेलोशिप तुमच्यासाठी आहे.
आमचे फेलो हे शाळा, सामाजिक संस्था, समुपदेशन सेवा आणि वस्ती पातळीवरील विविध कार्यक्रम अशा वेगवेगळ्या वातावरणात काम करतात.
फेलोशिपचे स्वरूप कसे आहे?
ऑनलाइन आणि ऑफलाईन असे मिश्र स्वरूप असणाऱ्या या फेलोशिपचा कालावधी आठ महिन्यांचा असून ती चार परस्परसंबंधित विषयांवर लक्ष केंद्रित करते:
विषय समजून घेणे
लैंगिकता, लिंगभाव, नातेसंबंध, मानवी प्रजनन संस्था, लिंगभाव ओळख आणि लैंगिक कलाच्या कक्षा आणि सर्वंकष लैंगिकता शिक्षण (CSE) संबंधी इतर अनेक महत्वाच्या विषयांचा पाया भक्कम करणे.
स्वतः:च्या आत डोकावून पाहणे
स्वतःच्या धारणा, सामाजिक जडणघडण आणि या विषयांमुळे निर्माण होऊ शकणारी अस्वस्थता यांवर चिंतन करणे.
कौशल्ये विकसित करणे
सर्वांचा सहभाग असणाऱ्या, सर्वसमावेशी आणि पूर्वग्रह रहित संवादासाठी सतत सराव करणे. आपल्या परिसरातील परिस्थिती आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या संदर्भानुसार सत्रांचे नियोजन करणे.
एकत्र शिकणे
वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांत काम करणाऱ्या अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घेणे आणि इतर सहकाऱ्यांसोबत आपले अनुभव, विचार आणि शिकलेल्या गोष्टींची देवाणघेवाण करणे.
लैंगिकता प्रशिक्षक बनण्याची प्रक्रिया प्रशिक्षण संपल्यावर थांबत नाही. ही फेलोशिप म्हणजे एका निरंतर प्रवासाचे स्वरूप आहे, जो प्रवास फेलोशिप पूर्ण झाल्यानंतरही पुढे सुरू राहतो.
आमच्या फेलो व्यक्तींकडून जाणून घ्या
लैंगिकता प्रशिक्षक (sexuality educator) बनणे म्हणजे नक्की काय? जेव्हा तुम्हाला तुमच्या गृहितकांवर, धारणांवर किंवा पूर्वग्रहांवर प्रश्न उपस्थित करण्याची, नवीन दृष्टिकोन आजमावून पाहण्याची आणि इतरांकडून शिकण्याची संधी मिळते, तेव्हा नक्की काय बदल घडतो?
आमच्या फेलोजनी मांडलेले त्यांचे अनुभव, त्यांच्या स्वतःच्याच शब्दांत.
अहवाल वाचाफेलोशिपच्या पुढच्या बॅचमध्ये सामील होण्यास उत्सुक आहात का?
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मर्यादित काळासाठी सुरू आहे. तुम्हालाही या फेलोशिपचा भाग व्हायचे असल्यास आम्हाला ईमेलद्वारे कळवा; पुढील बॅचची घोषणा होताच आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ.
तसेच, ताज्या घडामोडी आणि अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला सोशल मीडियावरही फॉलो करू शकता.






