Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

लग्न झालेल्या मैत्रिणीशी विना कंडोम सेक्स केला तर आजार होईल का ?

शेअर करा
प्रश्न

माझी एक मैत्रीण आहे तिचे लग्न झाले आहे तिचे तिच्या नवऱ्याशी संबंध झालेत.. मला तिच्या नरोबर सेक्स करायचा आहे तो ही विना प्रोटेकशन  जर मी तिच्याशे संभोग केला तर मला कोणता आजारहोईल का,?

उत्तरे (1)

उत्तर
July 18, 2017

तुमच्या “मी ‘एक्स’ व्यक्तीशी संबंध ठेवला तर आजार होईल का ?” या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास…तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत सेक्स करायचा आहे त्या व्यक्तीला जर लैंगिक संबंधांतून पसरणारा आजार असेल तर तुम्हालाही आजार होऊ शकतो. लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजाराविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.comcategory/sexual-health/.

तुमचा प्रश्न “मी ‘एक्स’ व्यक्तीशी संबंध ठेवला तर आजार होईल का ?” एवढ्यापुरता मर्यादित नसून त्याला अनेक भावनिक आणि सामाजिक पैलू आहेत त्याचा तुम्ही विचार करावा असे वाटते.

१.उघड आहे तुमचे हे संबंध तुम्ही जगासमोर स्वीकारण्याच्या स्थितीत नसणार आहात. ते लपवावे लागतील. कारण आपल्या समाजात ते स्वीकारले जाण्याची शक्यता नाही. असे संबध जर उघडकीस आले तर त्यातून तयार होणाऱ्या अडचणींना/ गुंतागुंतीला सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे का? त्यावेळी दोघांची एकमेकांना साथ असेल का? निर्णय काहीही घ्या पण त्याच्या परिणामांची जाणीव ठेवा आणि जबाबदारीही घ्या. त्यापासून पळून जाऊ नका किंवा माझा काही संबंध नाही असं नंतर म्हणू नका. कारण बहुतेक वेळेस पुरुषासाठी हे सोपं असू शकतं, बाईसाठी नाही…

२. या लैंगिक संबंधांमुळे तुमच्या मैत्रिणीच्या वैवाहिक नात्यामध्ये गुंतागुंत वाढू शकते.

३. दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.