Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

अँड्रॉजेंन हार्मोन्स स्त्रियांमध्ये का वाढतो?

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
July 20, 2017

अँड्रोजन हॉर्मोन स्त्री, पुरुष दोघांमध्ये देखील वाढू शकतो. प्रौढ पुरुषांमध्ये अँड्रोजनचे वाढलेले प्रमाण लवकर लक्षात येत नाही. तुलनेने लहान मुलांमध्ये तसेच स्त्रियांमध्ये ते लवकर लक्षात येते.

आपल्या शरीरात काही ग्रंथी आहेत ज्या विशिष्ट संप्रेरकं निर्माण करतात. ही संप्रेरकं अँड्रोजन आणि इस्ट्रोजन अशा दोन गटातील असतात. पुरुष आणि स्त्री अशा दोघांच्याही लिगांमध्ये दोन्ही गटातील संप्रेरकं तयार केली जातात. त्यांच्या प्रमाणात फरक असतो. स्त्री शरीरात इस्ट्रोजन तर पुरुषांच्या शरीरात अँड्रोजन जास्त प्रमाणात तयार होतात. या संप्रेरकांची जर योग्य प्रमाणात निर्मिती झाली किंवा गरजेपेक्षा जास्त झाली, तर त्याचा शरीरावर, प्रजनन कार्यावर आणि लैंगिक इच्छांवर परिणाम होतो.

स्त्रियांमध्ये अँड्रोजन (व त्याच्यापासून तयार होणारं प्रोजेस्टेरॉन) चं प्रमाण वाढलं किंवा काही कारणास्तव त्यांनी इंजेक्शनवाटे घेतलं (उदा. वेटलिफ्टर्स) तर त्यांचं शरीर पुरुषी बनायला लागतं. आवाज बदलणं चेहऱ्यावर पिंपल्स येणं, हनुवटी, चेहरा व अंगावर जास्त प्रमाणात केस येणं तसेच अनियमित मासिक मासिक पाळी किंवा मासिक पाळी न येणं, लैंगिक इच्छांमध्ये बदल, लैंगिक इच्छांमध्ये वाढ, असे काही बदल दिसतात. लहान मुलांमध्ये हे प्रमाण वाढले तर ते लवकर वयात येतात.

अँड्रोजनचे किती प्रमाणात वाढले आहे त्यावर लक्षणांची तीव्रता अवलंबून असते. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या शरीरात किती प्रमाणात अँड्रोजन हॉर्मोन/संप्रेरक वाढले आहे त्यावर त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे अवलंबून असेल. त्यामुळे वर नमूद केलेले बदल जर जास्त प्रमाणात दिसून आले तर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.