Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

मुलीस गरम करण्याची एखादी गोळी आहे का

शेअर करा

उत्तरे (2)

उत्तर
June 1, 2017

आपण स्त्रियांविषयी अनादर व्यक्त करणाऱ्या, हिंसक आणि शिव्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा वापर टाळण्यासाठी आवर्जून प्रयत्न केला पाहिजे. कधीकधी आपण हे शब्द इतक्या सहजतेनं वापरतो, की आपण यातून कुणाचातरी अनादर करत आहोत हेही आपल्या लक्षात येत नाही. आम्ही समजू शकतो की, काहींना पर्यायी शब्द माहीतच नसतात पण असे शब्द आपण माहित करून घेण्याचा आवर्जून प्रयत्न करूयात.

आता वळूयात तुमच्या प्रश्नाकडे- स्त्रिला लैंगिक उत्तेजना मिळावी/लैंगिक सुख मिळावे यासाठी काय करावे ?

सर्वप्रथम तुमची आणि तुमच्या जोडीदारांची तयारी आहे ना हे पहायला पाहिजे. सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचाही विचार व्हायला पाहिजे. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचे काही ‘इरॉटिक पॉइंटस’ असतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळत असतं. अशा शरीराच्या अवयवांना स्पर्श केला पाहिजे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. आपल्या जोडीदाराला कोणत्या अवयवांना स्पर्श केल्याने किंवा कोणत्या लैंगिक कृतीतून सुख मिळते याविषयी संवाद साधा. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. किमान पहिली २० मिनिटं फोरप्ले करावा. तसेच ‘फोरप्ले’ मध्ये शिस्निकेला (मूत्रमार्गाच्या वरचा भाग) स्पर्श केल्याने स्त्रीला उत्तेजित होण्यास मदत होते. एकमेकांना उत्तेजित करून संभोग केल्याने तो दोघांसाठीही आनंददायी असू शकतो. लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता या गोष्टी लैंगिक सुखास कारणीभूत ठरतात.

उत्तर
July 19, 2017