अंमलबजावणी आणि प्रभाव
सहज शाळेत कसं राबवलं जातं?
शाळेत सहज राबवताना आम्ही साधारणपणे पुढील टप्प्यांमधून हा कार्यक्रम पुढे घेऊन जातो. प्रत्येक शाळेची परिस्थिती वेगळी असल्यामुळे कामाचं स्वरूप शाळेनुसार बदलू शकतं.
- पालकांशी संवाद पालक हे मुलांचे सर्वांत पहिले आणि महत्त्वाचे लैंगिकता शिक्षक आहेत. म्हणून सहजची सुरुवात पालकांशी संवादानं होते. सहजमध्ये मुलांना काय आणि कशा पद्धतीनं शिकवलं जाणार आहे, हे पालकांना समजावून सांगितलं जातं. त्यांच्या प्रश्नांना आणि चिंतांना अवकाश मिळते आणि त्यांची संमती घेतली जाते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतरही गरजेनुसार पालकांशी संवाद सुरू राहतो.
- प्रयासच्या प्रशिक्षकांसोबत विद्यार्थ्यांची सत्रंसुरुवातीला प्रयासचे प्रशिक्षक विद्यार्थ्यांसोबत सहजची सत्रं घेतात. या काळात शिक्षकही सत्रांमध्ये सहभागी होतात. त्यामुळे त्यांना सहजचा दृष्टिकोन, सत्रांमधील विषय आणि मुलांसोबत या विषयांवर काम करण्याची पद्धत समजून घेता येते.
- शिक्षक शिकतात आणि शाळा हा कार्यक्रम पुढे नेते हळूहळू शिक्षकही सहजची सत्रं घेऊ लागतात. प्रयासचे प्रशिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात, सत्रांनंतर चर्चा करतात आणि आलेल्या अडचणींवर एकत्र मार्ग शोधतात.
लैंगिकता शिक्षणासाठी फक्त अभ्यासक्रमाची माहिती पुरेशी नाही. स्वतःच्या समजुती, पूर्वग्रह, मूल्यं आणि या विषयाबद्दलचा संकोच किंवा सहजता यांचाही विचार करणं महत्त्वाचं आहे. म्हणून शिक्षकांना “काय शिकवायचं” यासोबतच मुलांशी या विषयांवर मोकळेपणानं, संवेदनशीलपणे आणि आदरानं कसं बोलायचं, यासाठीही तयार केलं जातं.
हळूहळू शिक्षक सहजची सत्रं स्वतः घेऊ लागतात आणि शाळा हा कार्यक्रम नियमितपणे पुढे नेते. गरजेनुसार प्रयासचे प्रशिक्षक मार्गदर्शन आणि सहकार्य करत राहतात.
बदलाच्या दिशेने
0
सहज अंतर्गत शिकत असलेली मुले व तरुण
0
सहज राबवले जात आहे अशा शाळा आणि वसाहती
0
सहभागी झालेले प्रशिक्षक
0
सहभागी झालेले पालक
0
सहज इतक्या जिल्ह्यांमध्ये राबवले जात आहे
सहज प्रत्यक्ष राबवणाऱ्या शाळांचे अनुभव जाणून घ्या.
तुमच्या शाळेत 'सहज' (SAHAJ) घेऊन या.
सहज तुमच्या शाळेत राबवायचं आहे?
