Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

Sir माझे वय 22 आहे तोंडावरील पिंपल्स कसे घालवायचे काही औषध किंवा क्रिम सांगा. माझ्या छातीवर आणि पोटावर केस येत नाहीत काय करु आणि दाढी पण कमी (म्हणजे जवळ जवळ दाढी नाहीच) आली आहे जास्त दाढी येण्यासाठी काय करु.

Share

Answers (1)

Answer
July 19, 2017

पिंपल्स, दाढी, मिशा, छाती आणि इतर अंगांवर केस हे सर्व वयात येताना संप्रेरकांच्या (हार्मोन्स) च्या प्रभावामुळे होणारे बदल आहेत. आपल्याकडे हे बदल मुलांमध्ये साधारणपणे १२ व्या वर्षापासूनच दिसायला लागतात. पण प्रत्येक व्यक्तीनुसार हे भिन्न आहे. पिंपल्स वयानुसार निघून जातात. काळजी नको. दाढी मिशा अथवा छातीवर केस कधी कधी उशिरा येऊ शकतात. तुम्ही काळजी करणं सोडा.

दाढी मिशा नाही आल्या तरी फार काही बिघडत नाही. आपल्याकडे दाढी मिशांचा संबंध मर्दानगी, पुरुषत्व ई खोट्या कल्पनांशी लावला जातो. हे खूपच मागास आहे. तुम्ही त्याचे टेन्शन घेऊ नका. तुम्ही जसे आहात तसे छान आहात. पण तरीही तुमच्या मनात कायम ह्या गोष्टी येऊन त्रास होत असेल तर तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांना जरूर भेटा.

खाली एक लिंक दिली आहे ती जरूर पहा…

https://letstalksexuality.combody-image/