Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

गर्भधारणा झाली अाहे हे नक्की कधी कळते व गर्भधारणा झाल्यास कधी कधी किंचित रक्तस्त्राव होतो का?

Share

Answers (1)

Answer
January 21, 2016

साधारणपणे मासिक पाळीचक्रामध्ये अंडोत्सर्जन झाल्यावर १२-१६ दिवसांनी पाळी येते. गर्भधारणा झाली तर पाळी येत नाही. त्यामुळे जर लैंगिक संबंध आले असतील, कोणतंही गर्भनिरोधक वापरलं नसेल आणि नेहमीप्रमाणे पाळी वेळेवर आली नाही तर गर्भधारणेची शक्यता आहे असं समजावं. कधी कधी गर्भधारणा झाल्यावर पाळी येत नाही मात्र एक दोन थेंब रक्तस्राव होतो. मात्र मनात शंका असल्यास लवकरात लवकर गरोदरपणाची टेस्ट करू घ्या.