Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

aplyakadil baryach mulichi yoni films madhalya sarkhi ka naste

Share

Answers (1)

Answer
November 9, 2017

मुळात फिल्ममध्ये, पॉर्नोग्राफीमध्ये दाखवलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात. लैंगिक अवयवांची त्वचा पातळ आणि लवचिक असते त्यामुळे निसर्गतः सगळ्यांचेच लैंगिक अवयव इतर अवयवांच्या तुलनेत काळे असतात. हे अगदी नैसर्गिक आणि निरोगी आहे त्यामुळे काळजी करण्याची कारण नाही.

लैंगिक अवयवांची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. मात्र बाजारात काही कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी लैंगिक अवयव गोरे करण्यासाठी काही उत्पादने तयार करत आहेत त्याला बळी पडू नका. लैंगिक अवयवांजवळ अशा क्रीम्स किंवा उत्पादने लावल्याने उलट संसर्ग होण्याचा धोका असतो. शिवाय पैशांचा अपव्यय.

मुळात गोरे म्हणजे सुंदर आणि काळे म्हणजे कुरूप या सौदर्याच्या कल्पनेलाच छेद दिला पाहिजे. आपण निसर्गतः जसे आहोत तसेच खूप सुंदर आहोत.