Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

सिजर आपरेशन होऊन आठ वर्षे झाले तरीही सेक्स करतांना योनीत ओलावा निर्माण होत नाही त्यामुळे शिस्नास तेल लावावें लागते नाहीतर पत्नीला खूप त्रास होतो काहीतरी उपाय सांगा

Share

Answers (1)

Answer
October 9, 2020

योनीत योनीस्त्राव का तयार होत नाही याची कारणं शोधायला हवी आहेत, ती मानसिक आहेत की शारीरिक हे समजलं तर त्यावर उपाय करता येतील. त्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ /gynaecologist ला भेटा.

दुसरं अन महत्वाचं हे की संबंधांच्या वेळी तेल वापरु नका. तेल वा तेलयुक्त कुठलंच वंगण वापरु नका. तेल- तूप – क्रिम याने योनीतील जिवाणूंचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते. थुंकीचा सुद्धा फार काही उपयोग उपयोग होत नाही.

म्हणुन के वाय जेली मेडिकलमध्ये मिळते (जी पाणी व ग्लिसरिनने बनवलेली असते) ती वापरा. निरोधच्या वर अशाच प्रकारचे वंगण असते. तेव्हा तुम्ही निरोध ही वापरु शकता. गरज पडल्यास निरोधवर ही केवाय जेली वापरु शकता.