Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

सतत सेक्स करुन योनी मोठी झाली काय करावे लागेल?

Share

Answers (1)

Answer
November 14, 2017

मुळात सतत सेक्स केल्याने योनी फाकते किंवा योनीमार्ग सैल होते हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. जास्त सेक्स केल्याने योनीचा आकार वाढत नाही किंवा योनी फाकली जात नाही. योनी ही निसर्गतः लवचिक असते. निसर्गतः योनी गरजेनुसार सैल किंवा घट्ट होते. जेव्हा स्त्री लैंगिक दृष्ट्या उत्तेजित होते त्यावेळी लैंगिक संबंध सुखकर व्हावेत म्हणून निसर्गतः योनीचा आकार वाढतो आणि सेक्सनंतर तो मुळ स्थितीमध्ये येतो.

योनीमार्गाचे स्नायू बाळंतपण, सिझेरियन शस्त्रक्रिया, वारंवारचे गर्भपात किंवा कष्टाच्या कामामुळे सैल पडतात. केगेल व्यायामामुळे स्नायूंमध्ये घट्टपणा यायला मदत होते. याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/kegel-exercise/