Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

माझं एका मुलीवर प्रेम आहे तीचा स्वभाव मला खुप आवडतो पण ते प्रम व्यक्त करायला मला भिती वाटते ती माझ नाव घरी तर सांगनार नाही ना याची भिती वाटते मी तीचा खुप आदर करतो

Share

Answers (1)

Answer
July 19, 2017

अभिनंदन.. तू लकी आहेस, तू कोणाच्या तरी प्रेमात आहेस. ही खूप सुंदर आणि मानवी भावना आहे. मला असे वाटते की प्रेम व्यक्त करण्याची घाई करू नये. काही दिवस अव्यक्त प्रेमाचा आनंद घे! अजून तुझ्या मनात ती भावना मुरु दे. तिच्या बद्दलचा आदर व वाढत जाणारा आपलेपणा एकत्र नांदू दे. तिच्या भावना पण समजून घे, त्यांचा ही आदर कर. प्रेम व्यक्त करण्याची योग्य वेळ तुझी तुलाच उमगेल. So enjoy!