All questions
दिवसा तुन चार वेळा हस्तमैथुन केल्यावर लिंग का दुखते? विर्य कमी झाल्यामुळे का? विर्य दिवसाला शरीरात कमी तयार होते का?
Answers (1)
Answer
July 19, 2017
स्वाभाविक आहे. लिंगामध्ये रक्तप्रवाह वाढल्यामुळे लिंगाला ताठरता येते. हस्तमैथुन करून झाल्यानंतर हा रक्तप्रवाह शिथिल होतो आणि लिंग परत मूळ आकारात येते. पण हीच क्रिया दिवसातून अनेक वेळा केल्यामुळे लिंगाचे स्नायू दुखू शकतात कारण त्यांना पुरेसा आराम मिळत नाही. तुम्ही ऑफिसात सतत तीन पाळ्या केल्या तर तुम्ही बॉस वर रागवणार की नाही.. दिवसाला एका विशिष्ट प्रमाणात वीर्य तयार होत असते. ते तेवढेच होणार. तो काही वडापावचा गाडा नाही आपली ऑर्डर पुरवायला. चेष्टा केली, माफ करा. काळजी घ्या..
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas