Answers (1)
Answer
July 7, 2016
किस किंवा चुंबन हे स्पर्शाद्वारे प्रेम व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. किस कसा करावा किंवा चुंबन कसे घ्यावे याचं नेमकं उत्तर नाही. कोणी कपाळ, गाल किंवा चेहऱ्यावर इतर ठिकाणी किस देऊन प्रेम व्यक्त करेल तर कुणी हाताचा किस घेईल. चुंबन कसे घ्यायचे हे चुंबन घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून आहे. दोघेही सज्ञान, दोघांची इच्छा, संमती असणं आणि दोघांनाही सुरक्षित वाटणं मात्र महत्वाचं. प्रेमाच्या नावाखाली भावनिक दबाव आणून तसेच जबरदस्तीने चुंबन किंवा इतर लैंगिक कृती करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas