Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

आईचा निगेटिव्ह रक्तगट आहे

Share
Question

बायकोचा रक्तगट निगेटिव्ह असेल आणि नवर्याचा पॉझिटिव्ह असेल तर होणार्या बाळाचे धोके अन उपाय सांगा.

Answers (1)

Answer
February 22, 2021

समान रक्तगट असण्याचा लैंगिक जीवनाशी किंवा विकृत, अपंग, मतीमंद वा मृत मुल होणं वा न होणं (अशा प्रकारच्या काही भिती लोकांच्या मनात असतात) यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

रक्तगटासंबंधित एकमेव प्रश्न उद्भवू शकतो तो म्हणजे जर आईचा रक्तगट आरएच निगेटिव्ह (Rh negative) असेल आणि जर तीला आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर मात्र आईला पहिल्या बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर ४८ तासांच्या आत एक इंजेक्शन घ्यावे लागते. जर इंजेक्शन घेतले नाही तर आईच्या शरिरात त्याविरूद्ध ऍन्टीबॉडीज तयार होतात. त्यामुळे पहिल्या प्रेग्नंसी मध्ये अडचण येत नाही पण जर तिला पुन्हा पुढच्या वेळी देखील आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर त्या बाळावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. पण तुमच्या बाबतीत तो प्रश्न नाहिये तेव्हा काळजी करु नका.

पुन्हा एकदा आवर्जून नमूद करावेसे वाटते की समान रक्तगट असणाऱ्या किंवा रक्तगट आरएच निगेटिव्ह (Rh negative) असणाऱ्या पालकांना मुल होण्यात काहीही अडचण येत नाही. त्यामुळे चिंता करण्याचे काहीही कारण नाही. आणखी काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.