Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

Without condom sex kla ahe. 1 hr nantr i-pill chi ek tablet ghetli. Daily he routine Suru ahe maze. Feeling yenyasathi without condom sex krto v 1 hr nantr i-pill gheto. Tyache kahi side effects

Share

Answers (1)

Answer
March 24, 2021

एकदा निरोध शिवाय संबंध झाले असतील व त्यानंतर आय पिल घेतली हे समजण्यासारखं आहे पण रोज निरोध न वापरणं व रोज आय-पिल घेणं तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यासाठी फार धोकादायक आहे. कारण या गोळ्या फक्त तातडीच्या वेळी घेण्यासाठी आहेत रोज घेण्यासाठी नाही आहेत. या बाबत एक लेख आपल्या वेबसाईटवर आहे, त्याची लिंक सोबत देत आहे. https://letstalksexuality.com/ecp/ हा लेख वाचल्यावर बर्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील.

जर तुम्हाला रोज लैंगिक संबंध करायचे आहेत तर आणखी काही पर्याय आहेत. त्या पर्यायाबाबत अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा. https://letstalksexuality.com/contraception/

शेवटी हे लक्षात ठेवाल की, निरोध हा खूप सोपा पर्याय आहे, त्यासोबतच आय पिल ही गर्भधारणा न होण्यासाठी वापरली जाते. त्याने लिंगसांसर्गिक आजारांपासून (https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/) संरक्षण नाही होत. त्यासाठी निरोध हाच योग्य पर्याय आहे. फिलिंग ही निरोध वापरल्याने येत नाही हे पूर्ण सत्य नाही, आपली त्याकडे पाहण्याची मानसिकता व आपण प्राधान्य कशाला देतो – सुरक्षिततेला वा फिलिंगला आहे यावर सारं डिपेंड आहे. (https://letstalksexuality.com/myths-and-facts-about-condom/)