Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

माझ्या लिंगाच्या मुत्रमार्गाची नळी थोडी मोठी आहे: माझ्या लिंगाची नळी लिंगाच्या खालच्या भागाला असुन त्या नळीचा उघड भाग अर्धा सेमी लांब आहे कधी कधी अस वाटते की हा उघड भाग भविष्यात संभोग क्रियान मध्ये नुकसान होऊ शकते असा थोडासा लिंगाची नळी उघडी असेल तर पुढे धोका निर्मान होऊ शकतो का ?

Share

Answers (1)

Answer
January 31, 2017

सर्वात पहिलं म्हणजे, मूत्र मार्गाची नळी ही लिंगाच्या खालच्याच भागात असते. त्यामुळ याबद्दल चिंता करण्याचं कारण नाही.

प्रश्नातील दुसर्‍या भागाकडं वळू या. मूत्र मार्गाची नळी मोठी आहे असा तुमचा अंदाज आहे की तुम्हाला कोणी सांगितलं आहे? अनेकवेळा पुरुषांच्या मनामध्ये लिंगाच्या आकाराबाबत, मापाबाबत खूपच गैरसमज आढळून येतात. यातील अनेक समज-गैरसमज मित्रांच्या सांगण्यामुळं किंवा पॉर्न क्लिप्स पाहून तयार होतात. त्यामुळं तुम्ही विचारलेला प्रश्न तयार होत आहे हे तपासून पहा. मूत्र मार्गाच्या नळीमुळं भविष्यात काही समस्या निर्माण होईल असं वाटत नाही. तरीही तुम्हाला खात्री करुन घ्यायची असेल तर प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहील.