Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

मि वयाच्या १७ चा असल्यापासुन हस्तमैथुन करतो रोज आज माझे वय ३० आहे मि अविवाहित आहे?

Share

Answers (1)

Answer
January 6, 2017

हस्तमैथुन ही एक शरीराला आणि मनाला आनंद देणारी, इतरांना इजा न पोचवणारी लैंगिक क्रिया आहे. त्यात वाईट किंवा पाप असं काही नाही. स्वतःच्या शरीराला सुख देण्यामध्ये वाईट काय असणार? मात्र हस्तमैथुन करताना कोणत्याही टोकदार, धोकादायक वस्तूंचा वापर करू नका. ज्याने तुम्हाला, तुमच्या शरीराला इजा होईल अशा प्रकारे हस्तमैथुन करू नका.

दिवसातून कितीदा हस्तमैथुन करावं हे ज्याचं त्यानं ठरवायला हवं. तुमची रोजची कामं, नोकरी, काम, धंदा, छंद, अभ्यास, भेटीगाठी या सगळ्यांमध्ये अडथळा येणार नाही याची काळजी घ्या फक्त.