Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

Mazya Lagnala 1 varsh zala aahe aajun hi mazi patni pregnant nahi

Share

Answers (1)

Answer
October 27, 2016

पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. मासिक पाळी चालू झाल्यानंतर साधारण १२ ते १६ दिवसांनी अंडोत्सर्जन होतं. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे तुम्हाला पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. गर्भधारणा नक्की कशी होते? याबद्दल पुढे माहि्ती दिली आहे. गर्भधारणा न होण्यामागे विविध कारणं असू शकतात. यासाठी डॉक्टरांना भेटून काही तपासण्या करुन घेता येईल. स्त्री-पुरुष अशा दोघांच्या तपासण्या करणं आवश्यक असतं.

गर्भधारणा नक्की कशी होते

बहुतेक स्त्रियांच्या शरीरात गर्भाशय, बीजवाहिन्या आणि बीजकोष असतात. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या बीजकोषामध्ये अनेक स्त्री बीजं असतात. दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. बीजवाहिनीमध्ये हे बीज १२-२४ तास जिवंत असते. त्या काळात पुरुष बीजाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मिलन होऊन गर्भधारणा होऊ शकते. गर्भ तयार होईल या शक्यतेनुसार गर्भाशयामध्ये अनेक बदल होतात. गर्भाच्या पोषणासाठी गर्भाशयाचं अस्तर जाड होतं. मात्र पुरुष बीज न आल्यास हे बीज तिथेच विरघळून जाते आणि त्यानंतर 12-16 दिवसांनी गर्भाशयाचं अस्तर गळून पडायला लागतं. म्हणजेच पाळी येते.

पुरुष बीज कुठून येतं?

पुरुषाच्या शरीरात वृषणांच्या आत दोन बीजकोष असतात. मुलगा वयात येऊ लागला की या बीजकोषांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने पुरुष बीजं तयार व्हायला लागतात. यांनाच शुक्राणू असंही म्हणतात. असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला १००० पुरुष बीजं तयार होतात. आणि त्यातलं एकच गर्भधारणेसाठी पुरेसं असतं!

लैंगिक संबंधांदरम्याल जेव्हा पुरुषाचं लिंग ताठर झाल्यावर स्त्रीच्या योनीमध्ये प्रवेश करतं तेव्हा एका क्षणी लिंगामधून वीर्य बाहेर येतं. या वीर्यामध्ये लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं असतात. ती पोहत पोहत बीजवाहिन्यांच्या दिशेने प्रवास करू लागतात. बीजवाहिनीमध्ये तेव्हा स्त्री बीज असेल तर एक पुरुष बीज स्त्रीबीजामध्ये शिरतं आणि त्यातून फलित गर्भ तयार होतो. हा फलित गर्भ पुढील १० दिवसांमध्ये पुढे सरकत येतो आणि गर्भाशयाच्या भिंतीवर रुजतो. ही सर्व प्रक्रिया निर्धोकपणे पार पडली तर गर्भधारणा झाली असं म्हणता येईल.